औरंगाबाद - राज्यात प्राथमिक शाळा ( Primary School Reopen ) 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा नवा व्हायरस ( Corona new Omicron Variant ) येण्याची शक्यता पाहता, औरंगाबाद महानगरपालिकेच्या ( Aurangabad Municipal Corporation ) हद्दीतील शाळा दहा डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 डिसेंबर रोजी याबाबत पुढील आढावा बैठक घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
मनपाच्या शाळा राहणार बंद
सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेला कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन हा नवीन विषाणू अत्यंत घातक असल्याच बोलले जात आहे. त्याची प्रादूर्भाव क्षमता ही पुर्वीच्या विषाणूपेक्षा 500 % अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत महानगर पालिका आयुक्त अस्तिकुमार पांडेय यांनी आढावा बैठक घेत तुर्तास मनपा हद्दीतील शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आढावा बैठक पाच डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दहा तारखेला शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मनपा हद्दीत शाळा सुरू होणार नाही, अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात होणार शाळा सुरू
औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शाळा तूर्तास सुरू होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले असले तरी, ग्रामीण भागात मात्र प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. या आधी पाचवी ते सातवी ही शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर यापूर्वीच सातवी ते बारावीपर्यंत शाळा या सुरू करण्यात आले होते. कोरोनाचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णसंख्या घटली असल्याने एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळा सुरू करत असताना काही नियमांचे पालन शाळांना करावे लागणार आहे. मात्र ग्रामीण भागांमध्ये 1 डिसेंबरपासून शाळा या नियमित सुरू होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.