ETV Bharat / city

EXCLUSIVE : अजिंठा लेणीतील चित्र वाचवण्यासाठी इटलीहून आले होते कलाकार - EXCLUSIVE NEWS

अजिंठा लेणीला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा आहे. त्यातील कलाकुसर पर्यटकांना आकर्षित करते. मात्र ही कला आणि लेणीचे अस्तित्व टिकवण्यात निजामांचा मोठा वाटा आहे. १८१९ मध्ये अजिंठा लेणीचा शोध लागला मात्र त्यानंतर येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लेणीचे सौंदर्य खराब केले होते. त्यावेळी सातव्या निजामांनी इटलीहून मोठ्या खर्चावर कारागीर बोलवून लेणीचे अस्तित्व टिकवले.

अजिंठा लेणी
अजिंठा लेणी
author img

By

Published : Jul 25, 2021, 5:40 PM IST

औरंगाबाद - अजिंठा लेणीला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा आहे. त्यातील कलाकुसर पर्यटकांना आकर्षित करते. मात्र ही कला आणि लेणीचे अस्तित्व टिकवण्यात निजामांचा मोठा वाटा आहे. १८१९ मध्ये अजिंठा लेणीचा शोध लागला मात्र त्यानंतर येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लेणीचे सौंदर्य खराब केले होते. त्यावेळी सातव्या निजामांनी इटलीहून मोठ्या खर्चावर कारागीर बोलवून लेणीचे अस्तित्व टिकवले.

EXCLUSIVE : अजिंठा लेणीतील चित्र वाचवण्यासाठी इटलीहून आले होते कलाकार

निजामांनी दोन कलाकार आणून वाचवले चित्रांचे अस्तित्व
अजिंठा लेणी जगातील ऐतिहासिक वारसांमधलं सर्वात मोठं आश्चर्य मानलं जातं. अजिंठा लेणी तयार करताना किती मेहनत कारागिरांनी घेतली हे नवल करण्यासारखं आहे. मात्र लेणीचा शोध लागल्यानंतर काळाच्या ओघात लेण्यांमधील पेंटिंग नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. त्यावेळी सातवे निजाम उस्मान अली खान यांनी चित्रांचं संवर्धन करण्यासाठी इटलीवरून कलाकार बोलावले. कलाकारांना बोलावं इतकं सोपं नव्हतं, मात्र निजामाने त्यासाठी मोठा खर्च केला. कारण चित्रांचं संवर्धन कारण गरजेचं होत. त्यावेळी सातव्या निजामांनी काउंट ससोनी आणि काउंट ऑर्सोनी या दोन कलाकारांना खास लेणीच्या चित्रांचं संवर्धन करण्यासाठी इटलीवरून बोलावून घेतलं, अशी माहिती इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी दिली.

कॅसिन नावाच्या सिमेंटने केली चित्रांची दुरुस्ती
काउंट ससोनी आणि काउंट या दोन कलाकारांनी लेणी परिसरात काही महिने काम करत कॅसिन नावाचा सिमेंटसारखा प्रकार वापरून चित्रांणा जीवनदान दिलं. डॉ. जेम्स बर्ड नावाच्या डॉक्टरने लेणी क्रमांत १७ मध्ये दैनंदिन कामावर आधारित असलेली चित्र अक्षरशः भाजीच्या सालीसारखी शिलून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेक चित्र त्या ठिकाणावर तरंगत होती. अशी चित्र या दोन कलाकारांनी दुरुस्त केली. आजही लेणी परिसरात असेलेल्या चित्रांमध्ये अनेक ठिकाणी पांढरा भाग दिसतो तो भाग म्हणजे कॅसिन आहे, अशी माहिती इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी यांनी दिली.

इंग्रज पर्यटकांमुळे लेणीचे अस्तित्व आले होते धोक्यात....
असं म्हणतात लेणीची निर्मिती झाल्यावर जवळपास तेराशे वर्ष तिथे कोणी गेलं नाही. मात्र रॉबर्ट गिल नावाचा इंग्रज अधिकारी त्या परिसरात असताना त्याने ही लेणी शोधून काढत जगासमोर आणली. २८ एप्रिल १८१९ रोजी त्याने लेणीचा शोध लावला. जॉन स्मिथने लेणी क्रमांत १० मध्ये एका चित्रावर आपलं नाव आणि दिनांक कोरून आपण शोध लावल्याचं नमूद केलं. त्यानंतर लेणी पाहण्यासाठी आलेल्या अनेक देशी विदेशी पर्यटकांनी त्याच ठिकाणी आपली नाव कोरली. त्यामुळे त्या लेणींमधील एक बाजू पूर्णतः खराब झाली.

लेणी पाहताना लावलेल्या आगीमुळे लेणीतील चित्र झाले खराब
लेणीचा शोध लागल्यानंतर मिस्टर राल्फ नावाचे अधिकारी लेणी पाहण्यासाठी गेले. त्यांना लेणी स्पष्ट दिसली नाही म्हणून त्यांनी त्याठिकाणी आग पेटवली आणि लेणी पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी आगीमुळे काजळी निर्माण झाली आणि ती लेणीच्या आतील बाजूस असलेल्या चित्रांवर जाणून चिटकली. काळपट झालेले चित्र चांगली दिसावी म्हणून नंतर त्यांनी सर्व चित्र पावसाच्या पाण्याने धुवून काढली त्यामुळे अनेक चित्रांचा रंग उडाला. त्यांनतर जॉन ग्रिफिथ नावाचे अधिकारी आपल्या काही विद्यार्थ्यांसोबाबत लेणी परिसरात आले असताना त्यांनी प्रयोग करताना तिथे वार्निश वापरलं. त्यामुळे लेणीवर परिणाम झाला आणि लेणीतील चित्रण पिवळरांग येऊ लागला. कालांतराने लेणी खराब झाल्याचं दिसून आलं अनेक पर्यटंकानी तक्रार केली त्यानंतर इंग्रज सरकारने लेणी परिसरात पहारेकरी नियुक्त केले. या सर्व चित्रण पुन्हा चांगलं करण्यासाठी सातव्या निजामांनी दोन कलाकार आणून लेणीच सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न केला .

निजामांमुळे टिकले अस्तित्व
सातवे निजाम उस्मान अली खान यांनी अजिंठा लेणीच्या आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी त्यावेळी अर्कलॉजी ऑफ वेस्ट इंडियाची स्थापना केली. त्या अंतरंगात जिथं लेणीच्या संवर्धनासाठी काम केले. त्यामुळे जिथं लेणीच्या आतील चित्र आजदेखील पर्यटकांना पाहणे शक्य झालं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.