ETV Bharat / city

मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे पुन्हा 'ऑन फिल्ड'; क्वारंटाईन रुग्णांशी साधला संवाद

महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या घरी देखील कोरोनाने शिरकाव केला. पांडे यांच्या स्वयंपाक्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले होते. बरोबर चार दिवस 'होम क्वारंटाईन' राहिल्यानंतर आयुक्त पुन्हा कामावर आले आहेत. पांडे यांनी रस्त्यावर उतरत शहरातील काही क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्या व तेथील रुग्णांशी संवाद साधला.

author img

By

Published : Jun 30, 2020, 4:13 PM IST

Astik Kumar Pandey
आस्तिककुमार पांडे

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत जून महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या घरी देखील कोरोनाने शिरकाव केला. पांडे यांच्या स्वयंपाक्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले होते. बरोबर चार दिवस 'होम क्वारंटाईन' राहिल्यानंतर आयुक्त पुन्हा कामावर आले आहेत. पांडे यांनी रस्त्यावर उतरत शहरातील काही क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्या व तेथील रुग्णांशी संवाद साधला.

मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे पुन्हा 'ऑन फिल्ड'

काही दिवसांपूर्वी आयुक्तांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यामुळे, आस्तिककुमार पांडे व त्यांच्या पोलीस अधीक्षक पत्नी मोक्षदा पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, तरी देखील नियमाप्रमाणे आयुक्त आणि त्यांचे कुटुंब होम क्वारंटाईन राहिले. चार दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर आयुक्त आज कामावर आले. त्यांनी किले अर्क येथील कोविड केयर सेंटरला सकाळी आठ वाजता भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला.

या रुग्णांना वेळेवर जेवण, नाष्टा, पाणी इत्यादी सुविधा व्यवस्थित पुरवल्या जातात का? याची विचारणा आयुक्तांनी केली. सर्व सुविधा चांगल्या प्रकारे असून, सेंटरवर नियुक्त केलेला स्टाफ चांगले सहकार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया येथील रुग्णांनी आयुक्तांना दिली. काही अडचणी आल्यास रुग्णांनी सरळ मला मेसेज करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मजल्यावर पाणी पोहोचवा, रुग्णांना वेळेवर जेवण द्या, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या, अशा सूचना आयुक्त पांडे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी गारखेडा येथील क्रीडा संकुलाची पाहणी केली. क्रीडा संकुलात कमीत-कमी १ हजार लोकांना एकाच वेळी ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आज सकाळी जिल्ह्यात 252 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये 151 पुरूष व 101 महिला आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 535 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 हजार 669 रूग्ण बरे झाले आहेत. 259 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.