गंगापूर, औरंगाबाद शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून गंगापूर वैजापूर मार्गावर Road Stop on Gangapur Vaijapur Route मांजरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन Rasta Roko Movement of Farmers करण्यात आले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून, खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट ६० हजार हेक्टरी भरपाई देण्यात यावी, पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी Opposition Leader Ambadas Danve यासाठी राज्य शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मीक शिरसाट यांच्या Vivekananda Foundation President Valmik Shirsat मार्गदर्शनाखाली गंगापूर वैजापूर मार्गावर मांजरी फाटा येथे शेकडो शेतकऱ्यांच्या Ambadas Danve Criticise on New Government उपस्थितीत रास्ता रोको Aurangabad Rasta Roko आंदोलन करण्यात आले.
एनडीआरएफच्या निकषानुसार जाहीर झालेली मदत फसवी गंगापूरवरून वैजापूरकडे जात असताना मांजरी फाटा येथे सुरू असलेल्या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Opposition Leader Ambadas Danve यांनी भेट दिली. एनडीआरएफच्या निकषानुसार जाहीर झालेली मदत ही फसवी आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करीत आहे. काही भागांत प्रचंड पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे, तर काही भागांत कमी पाऊस आहे. पर्जन्यमापक यंत्रणा नसल्याने पावसाची नोंद होऊ शकली नाही. याला शासनाची धोरणे जबाबदार आहे. विधिमंडळात शेतकऱ्यांचा समस्या घेऊन सरकारला जाब विचारला आहे. पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहासमोर मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलन एक तासभर चालले. या रास्तारोको आंदोलनामुळे गंगापूर वैजापूर महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसहित अनेक मान्यवर उपस्थित यावेळी शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, मा. आमदार अण्णासाहेब माने पाटील, सुभाष कानडे, खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती सुभाष पाटील धोत्रे, अनिल धोत्रे, अनंता भडके, ऋषिकेश मनाळ, शरद कोळसे, कृष्णा कारभार, अशोक वालतुरे, चंद्रकांत जाधव, अरुण ठोकळ काकासाहेब जाधव, गोविंद जाधव, अशोक साळुंके, बापूसाहेब साळुंखे, सत्यजित क्षीरसागर, अनिल शिंदे, अनिल भागवत, विठ्ठल मिसाळ, जोसेफ माघाडे, सोमीनाथ शिंदे, गणेश वाघ, अनिल म्हस्के, योगेश म्हस्के, पोपट म्हस्के, अरुण शेळके, सादेक शेख, संजय रोकडे, भगवान सोनवणे, भागिनाथ मोरे, महेश कोतकर, नानाभाऊ लांडे, युनूस, सुवर्णाताई जाधव, वैजयंती शिरसाठ, संगीता वाघ, अंजली शिरसाठ, लीलाबाई बर्डे आदींसह महिला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.