ETV Bharat / city

मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षणाचा लढा एकत्र येऊन लढू - असदुद्दीन ओवैसी - मराठा आरक्षण बातमी

मुस्लीम आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लढाई लढणार. तसेच मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षणाचा(Muslim Reservation) लढा एकत्र येऊन लढू, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी(MIM President Asaduddin Owaisi) यांनी दिली आहे.

Asaduddin Owaisi
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : Nov 18, 2021, 8:37 PM IST

Updated : Nov 18, 2021, 8:50 PM IST

औरंगाबाद - मराठा आरक्षण(Maratha Reservation) आंदोलनकर्ते आता गप्प का आहेत? त्यांनी लढावं आम्ही त्यांना साथ देऊ, आरक्षणासाठी मराठा समाज जसा रस्त्यावर उतरला, तसे पर्याय आम्ही देखील वापरू, अन्याय सहन करणार नाही. तसेच मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षणाचा(Muslim Reservation) लढा एकत्र येऊन लढू, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी(MIM President Asaduddin Owaisi) यांनी दिली आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी
  • मुस्लीम आरक्षणासाठी लढणार - ओवैसी

मुस्लीम आरक्षण गरजेचे आहे, अजून किती दिवस अन्याय सहन करणार, आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. मुंबई हायकोर्ट म्हणते मुस्लिमांना शिक्षणात 4 टक्के आरक्षण मिळू शकते, तरी आम्हाला आरक्षण देत नाहीत हा मोठा अन्याय आहे. पूर्ण मुसलमान आरक्षण मागत नाहीत, ज्या 50 कास्टला हायकोर्टांने सांगितले आहे, त्यांनाच आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. राजकीय लोकं यावर बोलत नाहीत, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व राजकीय पक्षांना आमचे प्रश्न माहीत आहेत, किती मुसलमानांना कर्ज मिळते, किती लोक शिक्षण घेतात, किती लोक झोपडपट्टीत राहतात हे कुणीही सांगणार नाही, कारण यावर कुणालाच बोलायचे नाही, आम्हाला आरक्षण धर्मावर नको, मागासलेल्या मुस्लीम समाजात मागासलेल्या ज्या जाती आहेत, जसे हिंदूत असतात त्यांना आरक्षण द्या अन्यथा यावर आम्ही महाराष्ट्रात मोठं आंदोलन करणार आहोत, असा इशारा असदुद्दीन ओवैसी यांनी दिला.

  • मराठा समाजाप्रमाणे आंदोलन -

मराठा समाजाने एकीने सगळ्या राजकीय पक्षांना झुकवले आणि आरक्षण मिळवले, ते गेलेही, मात्र आता मराठा समाज शांत का? यापुढे आम्हीदेखील येतो तुमच्यासोबत, 27 नोव्हेंबरला मुंबई जाण्याचा नारा आम्ही दिला आहे. तुम्ही म्हणता समर्थन नाही, बघा त्या गर्दीत आमची यूनिटी आमची ताकत दिसेल. जसे मराठा रस्त्यावर आले तसे आम्हीही उतरू शकतो तोही ऑपशन आहे आमच्याकडे, नागपूर सेशनमध्ये मुस्लीम आरक्षण बिल आणावे, अन्यथा लढा सुरू राहणार आणि वाढणार, असे ओवैसी यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्रात दंगल झाली त्याचा निषेध आहे, मी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करतो, या घटनेची याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ओवैसी यांनी केली.

  • रस्त्यावर मटण-अंडे विक्री थांबवणे अन्यायकारक -

अहमदाबादेत रस्त्यावर मटण, चिकन विकू देत नाही असा निर्णय घेतला आहे. हे सर्व हॉटेलमध्ये विकले जाऊ शकते, रस्त्यावर का नाही? लोकांना बेरोजगार करणे, गरिबांना उपाशी ठेवणे हा धंदा आहे. गोडसेंचा पुतळा तिथे उभारतात आणि रस्त्यावरची दुकानं हटवतात, हे चूक आहे. यामध्ये मुस्लीम समाजापेक्षा इतर समाजाच्या लोकांचे जास्त नुकसान होणार आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली.

Last Updated : Nov 18, 2021, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.