ETV Bharat / city

Abdul Sattar: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा - कृषिमंत्री अब्दुल सत्तार - परतीचा पावसाने नुकसान

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे (panchnama of crops) करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये, असे मंत्री सत्तार यावेळी म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार
कृषिमंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Oct 15, 2022, 12:26 PM IST

औरंगाबाद: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत यावर्षी परतीच्या पावसाचा (return rain in Marathwada) मुक्काम वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे (panchnama of crops) करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये, असे मंत्री सत्तार यावेळी म्हणाले.

सहा हजार कोटींची मदत वाटप: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्तपणे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. पंचनामा करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदती पासून वंचित राहत कामा नये, अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्य शासनाने आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपयांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. एनडीआर च्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये, त्यांना योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार

बियाणांसाठी केलेला खर्च निघणेही कठीण: मराठवाड्यातील काही तालुक्यांत शेतशिवारात पाणी साचले आहे. सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटत आहेत. अतिवृष्टीमुळे बियाणांसाठी केलेला खर्च निघणेही कठीण हाेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, सिरंजनी, हिमायतनगर, सरसम, सवना, बोरगडी, धानोरा, घारापूर, डोल्हारी, कामारी, पोटा, मंगरूळ, वॉरंग टाकळी, सिरपल्लीसह अनेक गावांतील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. तसेच किनवट तालुक्यातील शिवणी, जलधारा या मंडळात दोन द‍िवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. माहूर, भोकर, अर्धापूर इतर तालुक्यातील पिकांचीही स्थ‍िती सारखीच आहे. औरंगाबााद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात १८०० हेक्टरवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र असून त्यापैकी काढणीला आलेल्या १ हजार हेक्टरवर नुकसान झाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त भागाचा करणार दौरा: अब्दुल सत्तार यांनी जुलै - ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला होता. आता सत्तार परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय पाहणी दौरा करणार आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच सरकार याबाबत निर्णय घेईल, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.