ETV Bharat / city

Crime News : इतर मुलांशी बोलली तर तुला...; तरुणीला धमकी - aurangabad crime news

इतर मुलांशी बोलली तर तुझीही कशिश होईल अशी धमकी मानलेल्या भावाने दिल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात समोर आली. मे महिन्याच्या शेवटी देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या कशिश उर्फ सुखप्रितची एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिची हत्या केली. क्रूर्णपणे ही हत्या करण्यात आली होती.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Jun 4, 2022, 5:43 PM IST

Updated : Jun 4, 2022, 5:50 PM IST

औरंगाबाद - इतर मुलांशी बोलली तर तुझीही कशिश होईल अशी धमकी मानलेल्या भावाने दिल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात समोर आली. या प्रकरणी दामिनी पथकाने समोपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धमकी देणारा तरुण महाविद्यालयातून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कशिशच्या हत्येने हदरले होते शहर - मे महिन्याच्या शेवटी देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या कशिश उर्फ सुखप्रितची एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिची हत्या केली. क्रूर्णपणे ही हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा आधार घेत वाळूज परिसरातील एका फार्मसी महाविद्यालयात शिकाणाऱ्या तरुणीला धमकी देण्यात आली. त्यामुळे तरुणींमध्ये भीतीचे वातावरणा पसरले आहे. तक्रारदार तरुणीची ओळख तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाशी झाली. काही दिवसांनी तरुणीकडून त्याने राखी बांधून घेतली. त्यानंतर मात्र तो सतत तक्रारदार तरुणीवर हक्क गाजावण्याचा प्रयत्न करू लागला. तिचे इतर मुलांशी बोलणे त्याला खटकत होते. त्यावरून अनेकवेळा त्यांचे खटके उडाले. मात्र तरुणी ऐकत नसल्याने तुझे देखील कशिशसारखे करेल अशी धमकी त्याने दिल्याने, तरुणीला मोठा धक्का बसला.

दामिनी पथक येताच तरुण पसार - कशिशच्या हत्येनंतर शहरात तरुणीचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन पथक निर्माण करण्यात आले. तक्रारदार युवतीने घडलेला प्रकार महाविद्यालयात प्राचार्यांना सांगितला. त्यांनी सदरील तरुणाला बोलून समजून सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी प्राचार्यांनी दामिनी पथकाला याबाबत माहिती दिली. मात्र, दामिनी पथक येण्याच्या आतच तरुण तिथून पसार झाला. जाताना व्हॉट्स अँप ग्रुपवर प्राचार्य, यांच्यामुळे आणि तरुणीमुळे आत्महत्या करणार असल्याचे त्याने मजकूर टाकला. पोलिसांनी तातडीने तक्रारदार तरुणीला पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे तक्रार देण्यास सांगितले. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Last Updated : Jun 4, 2022, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.