औरंगाबाद - आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून 115 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 5 फेब्रुवारीला शहरासाठी आमचं गॅरंटी कार्ड जाहीर करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुभाष माने यांनी दिली.
हेही वाचा - औरंगाबादेत वॉर्ड हरवला, नगरसेवकाची पोलिसात तक्रार
औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. मात्र, ही ओळख कचऱ्याचे आणि खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. या शहराला त्याची ओळख मिळवून देण्यासाठी आम आदमी पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे डॉ सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन महिन्यात औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यात आता आम आदमी पार्टी देखील आपली ताकद आजमावणार असल्याची माहिती शहराध्यक्ष डॉ सुभाष माने यांनी दिली. निवडणूक लढवत असताना पूर्ण ताकतीने आम्ही मैदानात उतरणार असून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि त्यानंतर पक्षाचा जाहीरनामा नाही तर 'गॅरंटी कार्ड' आम्ही जाहीर करू. या शहराचा 20 वर्षांमध्ये जो विकास थांबला आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षातर्फे देण्यात आली.