औरंगाबाद - मिठाई दुकानदाराने आपल्या दुकानातून काम सोडून गेलेल्या कामगारांचे अपहरण करून त्याला मारहाण करत तीन दिवस डांबून ठेवले. हा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. या प्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मगराज मांगीलाल नाई गेल्या काही वर्षांपासून रेल्वे स्टेशन रोडवरील मधुर मिलन या मिठाईच्या दुकानात काम करत होते. ठरल्याप्रमाणे पैसे मिळत नसल्याने मगराज याने काम सोडून नाशिक येथील नांदगाव येथे दुसऱ्या दुकानात काम सुरू केले. त्याचा राग मनात ठेवत दुकान मालकाने नांदगाव येथून मगराजचे अपहरण केले. त्याला औरंगाबाद येथील गोदामात आणून मारहाण केली, त्यानंतर तीन दिवसांपासून त्याला डांबून ठेवले होते.
औरंगाबादेत कामगाराला अपहरण करून मारहाण, दुकानदारसह सहा जणांवर गुन्हा दाखल - औरंगाबादेत कामगाराला मारहाण
मगराज मांगीलाल नाई गेल्या काही वर्षांपासून रेल्वेस्टेशन रोडवरील मधुर मिलन या मिठाईच्या दुकानात काम करत होते. ठरल्याप्रमाणे पैसे मिळत नसल्याने मगराज याने काम सोडून नाशिक येथील नांदगाव येथे दुसऱ्या दुकानात काम सुरू केले. त्याचा राग मनात ठेवत दुकान मालकाने नांदगाव येथून मगराजचे अपहरण केले. त्याला औरंगाबाद येथील गोदामात आणून मारहाण केली, त्यानंतर तीन दिवसांपासून त्याला डांबून ठेवले होते.