ETV Bharat / city

शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्यासाठी सैनिकाचा अनोखा प्रण.. तीन वर्षांनी दाढीला लावला वस्तरा

औरंगाबादचा हर्षवर्धन त्रिभुवन हा हाडाचा शिवसैनिक असून शिवसेनेची सत्ता येणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी शपथ त्याने घेतली होती. अशी आगळीवेगळी शपथ घेतलेल्या शिवसैनिकाने विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यावर तीन वर्षांनी पूर्ण दाढी केली.

शिनसेना औरंगाबाद
हर्षवर्धन त्रिभुवन
author img

By

Published : Dec 3, 2019, 2:25 PM IST

औरंगाबाद- जोपर्यंत शिवसेनेची सत्ता येणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही. अशी आगळीवेगळी शपथ घेतलेल्या शिवसैनिकाने विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यावर तीन वर्षांनी पूर्ण दाढी केली. हर्षवर्धन त्रिभुवन या युवकाने ही आगळीवेगळी शपथ घेतली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्याने घेतलेला प्रण पूर्ण झाला आणि त्याची भीष्मप्रतिज्ञा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली.

प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन त्रिभुवन

औरंगाबादचा हर्षवर्धन त्रिभुवन हा हाडाचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हर्षवर्धन प्रभावित आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होईपर्यंत पूर्ण दाढी म्हणजेच क्लीन शेव करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्याने घेतली. कुठल्याही परिस्थितीत शिवसेना वाढवायची असा निश्चय त्याने केला होता.

शिवसेनेचा उपविभागप्रमुख असलेला हर्षवर्धन त्रिभुवन एका खासगी रुग्णालयात ऑपरेशन हेड म्हणून काम करतो. हर्षवर्धन बालपणापासून शिवसेना पक्षाशी संबंधित आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने निश्चय केला होता की, जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हाच क्लीन शेव (दाढी) करेल. त्यावेळी अनेकांनी हर्षवर्धनची चेष्टा केली, घरातील मंडळीही याबाबत रागावत होती. परंतु, हर्षवर्धनने निश्चय मोडला नाही. जेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा हर्षवर्धनचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे त्याने आपली शपथ पूर्ण झाल्यावर तीन वर्षांनी पूर्ण दाढी केली. उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न तर सोडवतीलच परंतु सामान्य माणसांच्या अडचणीदेखील ते सोडवतील, असा विश्वास हर्षवर्धन त्रिभुवन या शिवसैनिकाला आहे.

Intro:जाेपर्यंत शिवसेनेची सत्ता येणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी आगळीवेगळी शपथ घेतलेल्या शिवसैनिकाने विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यावर तीन वर्षांनी पूर्ण दाढी केली. औरंगाबादच्या हर्षवर्धन त्रिभुवन या युवकाने ही आगळीवेगळी शपथ घेतली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्याने घेतलेला प्रण पूर्ण झाला आणि त्यांची भीष्मप्रतिज्ञा पूर्ण झाली.Body:औरंगाबादचा हर्षवर्धन त्रिभुवन हा हाडाचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हर्षवर्धन प्रभावित आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होई पर्यंत पूर्ण दाढी म्हणजेच क्लीन शेव करणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने घेतली. कुठल्याही परिस्थितीत शिवसेना वाढवायची असा निश्चय त्याने केला होता.
Conclusion:शिवसेनेचा उपविभागप्रमुख असलेला हर्षवर्धन त्रिभुवन एका खाजगी रुग्णालयात ऑपरेशन हेड म्हणून हे काम करतात. हर्षवर्धन बालवयात होतो तेव्हा पासून शिवसेनेसोबत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने निश्चय केला होता की जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हाच क्लीन शेव (दाढी) करेल. त्यावेळी अनेकांनी हर्षवर्धन याची मजा उडवली, घरातील मंडळी देखील याबाबत रागावत होते. परंतु हर्षवर्धनने निश्चय मोडला नाही. जेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा आवर्धनचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे त्याने आपली शपथ पूर्ण झाल्यावर तीन वर्षांनी पूर्ण दाढी केली. उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न तर सोडवतीलच परंतु सामान्य माणसांच्या अडचणी देखील ते साेडवतील असा विश्वास हर्षवर्धन त्रिभुवन या शिवसैनिकाला आहे.
Byte - हर्षवर्धन त्रिभुवन - शिवसैनिक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.