औरंगाबाद: दुष्काळी भाग समजला जाणाऱ्या मराठवाड्यात गेल्या काही वर्षांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. (damage due to rain in marathwada). शासनाकडून मात्र नुकसान भरपाई मिळेल याची चिन्हे काही दिसत नाहीत. यंदा अतिवृष्टीने मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यातील 10 लाख 59 हजार 612 शेतकऱ्यांच्या तब्बल 7 लाख 38 हजार 750 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. (heavy rain in marathwada).
सात जिल्ह्यात मोठे नुकसान: यंदा मराठवाड्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ह्या नुकसानीची किंमत 599 कोटी 7 लाख 90 हजार रुपये एवढी असून ती कधी मिळेल, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अवेळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
गोगलगाय मुळे झाले नुकसान: गोगलगाईच्या आक्रमणामुळे बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात जवळपास 1 लाख 18 हजार 996 शेतकऱ्यांच्या 72,491 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या भरपाई म्हणून शासनाने समितीच्या अहवालानुसार जाहीर केलेली 98 कोटी 58 लाख रुपयांची मदत तीनही जिल्ह्यांसाठी पाठवली आहे.
सततच्या पावसाने शेतीपिकाचे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
जिल्हा | शेतकरी संख्या | हेक्टर |
औरंगाबाद | 16410 | 12679 |
जालना | 1150 | 678 |
परभणी | 4486 | 2545 |
हिंगोली | 139800 | 96677 |
बीड | 160 | 48.80 |
लातूर | 374660 | 213251 |
उस्मानाबाद | 155258 | 113741 |