औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा मृत्युदर एक ते दीड टक्क्यांवर असला तरी प्रत्येक दहा दिवसांनी मृतांची संख्या आधीपेक्षा दुपटीने वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मार्च महिन्यात 435 जणांचा मृत्यू
गेल्या पाच महिन्यांपासून मंदावलेली कोरोना रूग्णसंख्येची गती फेब्रुवारीच्या मध्यानंतर अचानक वाढली. शंभरीखाली गेलेली बधितांची आकडेवारी रोजच हजारांच्या पार जाऊ लागली. त्यात मार्च महिन्यात तर बधितांचे उच्चांकी आकडे रोज समोर येऊ लागले. नव्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्याही त्याच पटीने वाढली आहे. मार्च महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात 35,573 नवे रुग्ण आढळून आले असून 435 जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादेत कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढले, मार्च महिन्यात 435 जणांचा मृत्यू
मार्च महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात 35,573 नवे रुग्ण आढळून आले असून 435 जणांचा मृत्यू झाला आहे.