ETV Bharat / city

औरंगाबादेत बुधवारी दिवसभरात 34 नवे रुग्ण, 24 तासात 4 मृत्यू - औरंगाबाद कोरोना रुग्ण संख्या 687

औरंगाबाद शहराच्या संजय नगरातील चार, किल्लेअर्क आणि नूर कॉलनीतील प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून चार महिला आणि दोन पुरूष आहेत.

corona virus
corona virus
author img

By

Published : May 14, 2020, 9:10 AM IST

औरंगाबाद - दिवसभरात कोरोनाचे 34 रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या 687 झाली आहे. आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 20 पुरूष आणि 14 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर, मागील 24 तासांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. आठ जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

औरंगाबाद शहराच्या संजय नगरातील चार, किल्लेअर्क आणि नूर कॉलनीतील प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून चार महिला आणि दोन पुरूष आहेत. तर, दोन घाटीतील रुग्णांनाही डिस्चार्ज मिळाल्याने एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे. आतापर्यंत 70 जण मिनी घाटीतून, घाटीतून तीन, मनपाच्या कोविड केअर केंद्रातून 132, खासगी रुग्णालयातून पाच असे एकूण 210 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मिनी घाटीत बुधवारी 42 स्वॅब घेतले असून ते घाटीच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील 14 आणि अन्य दोन असे एकूण 16 अहवाल येणे बाकी आहेत.

नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये राम नगर (01), संजय नगर (02), नवयुग कॉलनी, भावसिंग पुरा (01), आरटीओ ऑफिस जवळ, पद्मपुरा (01), भुजबळ नगर, नंदनवन कॉलनी (01), वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी (01), नंदनवन कॉलनी (01), गग,नबावडी, नंदनवन कॉलनी (02), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक दोन (02), गांधी नगर, गल्ली क्रमांक एक (01), जयभवानी नगर (05), विजय नगर, गारखेडा परिसर (01), सातारा परिसर (02), एन आठ (01), रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. चार (02), हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर (03), घाटी परिसर (01), भडकल गेट (01), अरुणोदय कॉलनी (01), सिल्क मिल कॉलनी (01), कैलास नगर (01), सिल्लेखाना (01), शहा बाजार (01) या परिसरातील आहेत. तर रहेमानिया कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच घाटीत मागील 24 तासात तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याचेही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.