मुंबई - राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. राज्यात या महिन्यात १, ६ आणि १८ जुलैला कोरोना विषाणुच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळला आहे. शुक्रवारी राज्यात ६,६०० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना रुग्ण आढळून आला तर, शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मागील पंधरा दिवसांमध्ये औरंगाबादेत 30 शाळा बंद करण्यात आल्या. यावरून राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येते.
'बंद झालेल्या शाळांमध्ये'
औरंगाबाद तालुका - 92 पैकी 1, कन्नड - 72 पैकी 2, गंगापूर - 84 पैकी 7, पैठण - 61 पैकी 5, फुलंब्री - 58 पैकी 1, वैजापूर - 51 पैकी 12, सिल्लोड - 120 पैकी 2 शाळा बंद करण्यात आल्या असून, या भागातील गाव कोरोना मुक्त होताच शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यात ७,४३१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ७,४३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,६०० नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३२,५६६ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७७,६०,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९६,७५६ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७९,५५३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७७,४९४ सक्रीय रुग्ण आहेत.
मृत्यू संख्या वाढली -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.१ टक्के नोंदवण्यात आला आहे.