अमरावती अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील रहिवासी अठरा वर्षे युवती मंगळवारी घरातून पळून गेली होती. युती पसार झाल्यामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता या मुलीचा शोध घेतला असता ती गुरुवारी सातारा येथे सापडली. आज पहाटे अमरावती पोलिसांनी तिला साताऱ्यावरून अमरावतीत आणल्यावर तिला तिच्या कुटुंबीयांकडे Young Woman returns home due to Amravati Police सोपविले.
रागावल्यामुळे सोडले होते युवतीने घर शुल्लक कारणावरून घरातील सदस्यांसोबत वाद झाल्यामुळे मला राग आला होता. त्यामुळे मी घर सोडून निघून गेले, असे या युवतीने स्पष्ट केले आहे. आज पहाटेची आपल्या घरी पोहोचली, तेव्हा तिच्या आईने तिला बिलगुन आनंद व्यक्त केला. मुलगी सुखरूप घरी परतल्यामुळे हमालपुरा येथील युतीच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पोलिसांनी चौकशीसाठी एकाला घेतले होते ताब्यात हमालपुरा परिसरातील युवती घरून निघून गेल्यामुळे, खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या युतीला लव जिहाद अंतर्गत पळवून नेले असल्याचा आरोप केला Love Jihad case Amravati होता. खासदार नवनीत राणा यांनी या विषयावरून राजापेठ पोलीस ठाण्यात चांगलाच राडा घातला होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात एका युवकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. मात्र त्या युवकाचा या मुलीशी पळून जाण्यास सोबत कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. युवतीच्या मैत्रिणींची देखील पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर ही युवती नेमकी कुठे गेली, याचा तपास अमरावती पोलिसांनी यशस्वीपणे लावला. Young Woman in Love Jihad case returns home due to Amravati Police achievement
हेही वाचा Amravati love jihad case लव जिहाद प्रकरणातील तरुणी अखेर सापडली; अमरावतीत पोहोचणार achievement