ETV Bharat / city

Heavy Rains in Amravati : अमरावती जिल्ह्याला सावधानतेचा इशारा; पुढील दोन दिवस अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 84 जणांना ( 84 person Kill Due to Heavy rain in Maharashtra ) आपला प्राण गमवावा लागला आहे. आता हवामान खात्याने अमरावती जिल्ह्याला सावधानतेचा इशारा ( Meteorological Dep warns Amravati ) दिला आहे. दोन दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्याला सावधानतेचा इशारा ( Entire District has been warned ) दिला आहे.

Upper Wardha Dam
अप्पर वर्धा धरण
author img

By

Published : Jul 14, 2022, 7:08 AM IST

Updated : Jul 14, 2022, 7:17 AM IST

अमरावती : गेली सहा ते सात दिवसांपासून अमरावतीसह महाराष्ट्राभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने अमरावती जिल्ह्यात ( Meteorological Dep. warns Amravati ) पुढील दोन दिवस अति मुसळधार पाऊस ( Two Days of Torrential Rain ) कोसळणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याला सावध राहण्याचा ( Entire District has been warned ) इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र कोसळणार मुसळधार : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये 100 ते 180 मिलिमीटर पर्यंत पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यासह चांदूरबाजार, अचलपूर, अमरावती, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी 70 ते 100 मिलिमीटर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात सावधतेचा इशारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह नदीनाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या गावात नदीकाठी पुराच्या भिंती आहेत, अशा ठिकाणी असलेल्या जनावरांच्या गोठ्यात जनावरे बांधून ठेवू नये, अशी सूचनादेखील ग्रामस्थांना देण्यात आली आहे.

अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडले : विदर्भातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा बुधवारी रात्रीपर्यंत 70% च्या वर झाला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी रात्री 11 वाजता 20 सेमीपर्यंत उघडण्यात आले. या दरवाजातून 160 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे.

धरणालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा : मध्य प्रदेशात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण झपाट्याने तुडुंब भरत आहे. अप्पर वर्धा धरणालगत असणाऱ्या गावांनादेखील सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळून अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा वाढला, तर धरणाच्या 13 दरवाजांपैकी आणखी काही दरवाजे उघडल्या जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस : मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्येही अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत आतापर्यंत राज्यात पावसाचे सुमारे 84 बळी गेले आहेत. तर 180 जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण विभागात मुंबई उपनगरात एका व्यक्तीला तर ठाणे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्या पाठोपाठ पालघरमध्ये चार जणांचा पावसात बळी गेला आहे. तर कोकणात 46 जनावरांचा बळी गेला आहे.

एनडीआरएफ आणि एचडीआरएफची पथके तैनात : राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात कांजूरमार्ग आणि घाटकोपर येथे प्रत्येकी एक एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. रायगड महाड येथे दोन एनडीआरएफची पथके तर ठाणे रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. सातारा सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले असून राज्यात आता एनडीआरएफची तेरा पथके तैनात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यात एसडीआरएफची प्रत्येकी एक पथक तैनात असून गडचिरोली जिल्ह्यात दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. तर मुंबई बेस्ट स्टेशनला इंडियाची तीन पथके तयार असून पुणे आणि नागपूर बेसला प्रत्येकी एक पथक तयार ठेवण्यात आल आहे.

हेही वाचा : Red Alert In Pune : पुण्यात ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

हेही वाचा : Heavy Rain in Mumbai : गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

हेही वाचा : Maharashtra Heavy Rains Impact : मुसळधारचा फटका ! राज्यात आत्तापर्यंत पावसामुळे 84 जणांचा मृत्यू

Last Updated : Jul 14, 2022, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.