अमरावती - 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे हत्या झाल्याचें स्पष्ट झाले आहे आता. या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आलेला. उमेश कोल्हे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे या अहवालानुसार उमेश कोल्हे यांचा मानेच्या डाव्या बाजूला जुगुलर वेन आणि कॅरोटीन आर्टरी कापल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मानेच्या डाव्या बाजूला 8 बाय 2 इंच जखम झाली होती. त्यामुळे मेंदूला जाणारा रक्तपुरवठा बंद झाल्याने उमेश कोल्हे यांचा मृत्यू झाला. आहे.
-
NIA conducts searches at multiple locations in Maharashtra pertaining to the murder of Umesh Kolhe in Amravati pic.twitter.com/r1hrMR2EVX
— ANI (@ANI) July 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NIA conducts searches at multiple locations in Maharashtra pertaining to the murder of Umesh Kolhe in Amravati pic.twitter.com/r1hrMR2EVX
— ANI (@ANI) July 6, 2022NIA conducts searches at multiple locations in Maharashtra pertaining to the murder of Umesh Kolhe in Amravati pic.twitter.com/r1hrMR2EVX
— ANI (@ANI) July 6, 2022
21 जूनला झाली हत्या - 21 जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील घंटी घड्याळ परिसरात तिघा जणांनी उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला केला होता. हत्याऱ्यांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला होता. या घटनेमुळे अमरावती शहरात प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केली असून या गंभीर प्रकरणाचा तपास आता एनआयए करीत आहे.
दरम्यान, अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली ( Amravati Chemist Murder ) होती. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं ही हत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केलं ( Umesh Kolhe Murder Case Due Post About Nupur Sharma ) आहे. तसेच, उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास अमरावती पोलिसच करत असल्याचेही साळी ( DCP Vikram Sali ) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गळा चिरुन हत्या - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 'अटक केलेल्या आरोपींकडे हत्येचा हेतू स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही हत्या या प्रकाराचीच संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले,' असे उपायुक्त साळी यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.
तिघांपैकी एकाने केला गळ्यावर वार - त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली
सातव्या आरोपीला नागपूरमधून अटक - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अमरावती पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. शेख इरफान शेख रहीम असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहे. नुपूर शर्मा प्रकरणात सोशल मीडियावर उमेश कोल्हे यांनी पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचे अमरावती पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कालपर्यंत एकूण सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणात सातव्या आरोपीला नागपूर येथून अटक केली आहे.
हेही वाचा - Spiritual Leader Murder : पैशाच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून, संशयित ड्रायव्हर फरार