अमरावती - शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान ( Accused Irrfan Khan ) हा खासदार नवनीत राणा, ( MP Navneet Rana ) आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांचा खास कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या फेसबुक पेजवर लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांच्या ( Lok Sabha election campaign on Facebook page ) प्रचाराच्या अनेक पोस्ट तसेच नवनीत राणा विजयी झाल्यावर त्यांना शुभेच्छा देणाऱ्या विविध पोस्ट त्याने शेअर केल्या आहेत.
भाभी को जीत मुबारक - काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून 2019 च्या निवडणुकीत रिंगणात असणाऱ्या नवनीत राणा यांचा प्रचार करण्यात इरफान खान हा आघाडीवर होता. इरफान खान हा राणा समर्थक असून नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर मुबारक हो भाभी असा उल्लेख करीत त्याने खासदार नवनीत राणा यांच्या विजयाच्या जल्लोषाशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. 23 मे 2019 रोजी इरफान खान येणे खासदार नवनीत राणा यांचा फेट्यावर असणारा फोटो शेअर करीत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या या संदर्भात त्याच्या फेसबुक पेजवर आता देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ असल्याचे आढळून येते.
राणा म्हणतात आमचा संबंध नाही - उमेश कोल्हे हत्याकांड्यानंतर उमेश कोल्हे यांच्या घरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी तीन वेळा भेट दिली. राणा दंपत्याने आज कोल्हे यांच्या घरासमोर हनुमान मंदिरात कोल्हे दांपत्यासह हनुमान चालीसा पठण देखील केले. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी राणादांपत्याकडून केली जात असताना त्यांचा कार्यकर्ताच मुख्य आरोपी आहे याबाबत त्यांना विचारले असता आमचा इरफान खान याच्याशी कुठलाही संबंध नाही तो आमच्या संघटनेचा कधीही कार्यकर्ता नव्हता. निवडणूक काळात अनेकांनी आमच्या विजयाचा जल्लोष साजरा केला त्यामध्ये नेमकी कोण कसे व्यक्ती होते आम्हाला माहिती नसल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण - नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे ( Nupur Sharma Social media Post) अमरावती शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे ( Pharmacist Umesh Kolhe ) यांची 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजता घंटी घड्याळ परिसरात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात एकूण सात जणांना ( seven arrested Umesh Kolhe murder case ) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास आता अमरावती पोलिसांकडून एएनआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान अमरावती शहरात एकूण तीन व्यक्तींना नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे धमकी मिळाली असल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील या व्यक्तीला दिवसभर एका पोलिसाचे संरक्षण देण्यात आले. शुक्रवारी रात्री ही व्यक्ती आपल्या दुकानातून घरी पोहोचली असताना त्यांच्या घराची सहा जणांनी रेकी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या संरक्षणासाठी असणारा पोलीस कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाला असताना त्याला एकूण सहा जण संशयित्रीच्या तक्रारदार व्यक्तीच्या घराच्या परिसरात दिसले. या सहाही व्यक्तींची हालचाल संशयास्पद असल्याचे, कळतात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना सूचित केले.
सात जणांना झाली होती अटक - एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.
हत्येचा तपास एनआयएकडे - दरम्यान, नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.