ETV Bharat / city

अमरावतीत एकाच दिवशी दोघांची हत्या; भावाने भावाची तर मामाने केली भाच्याची हत्या - brother killed his brother

अमरावती जिल्ह्यात एकाच दिवशी दोन जणांची हत्या करण्यात आली. एका घटनेत भावनेच सख्ख्या भावाची तर दुसऱ्या घटनेत मामाने भाच्याची हत्या केली आहे.

Amravati assassination
अमरावती हत्या
author img

By

Published : Mar 5, 2020, 8:18 AM IST

अमरावती - जुन्या वैमनस्यातून मामानेच आपल्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे बुधवारी रात्री घडली. तर दुसऱ्या घटनेत अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती कारणावरून लहान भावाचा मोठ्या भावाने खून केला.

अमरावतील जिल्ह्याच एकाच दिवशी दोघांची हत्या...

हेही वाचा... लग्नासाठी आलेल्या आईसह दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

चांदुर बाजार येथील घटनेत मो एजाज (२७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी त्याचा मामा मोहम्मद गमी इजाज (50) याला अटक केली. तर राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मायानगर येथे घडलेल्या घटनेत अक्षय अरुण कुटाफळे (23) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

अक्षय याला दारूचे व्यसन असल्याने परिवार त्रस्त होता. त्यामुळे त्याचा भाऊ अभिषेक याने त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे. मात्र, एकाच रात्री दोन हत्यांच्या घटनांनी अमरावती जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.