ETV Bharat / city

Contaminated Water in Melghat : अमरावतीमधील पाचडोंगरी गावात दूषित पाण्यामुळे दोन जणांचा मृत्यू; ५० ते ६० जणांची प्रकृती चिंताजनक - Breaking news

अमरावती जिल्ह्यातील ( In Chikhaldara taluka of Amravati ) चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी गावात ( In Pachdongari village ) दूषित पाणी पिल्यामुळे ( Drinking contaminated water ) २ जणांचा मृत्यू झाला असून, अंदाजे ५० ते ६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मेळघाटात पाणीपुरवठा विभागात होणारे निकृष्ट दर्जाचे ( Durty Work ) काम व भ्रष्टाचार ( Corruption in Water Supply ) यामुळे मेळघाटातील जनतेला आपले प्राणसुद्धा गमवावे लागत असताना मात्र काही अधिकारी मागील अनेक वर्षापासून खुर्चीवर कायम आहेत. पाच डोंगरी गावाचा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद असल्यामुळे गावकरी गावातीलच रज्जी भानू अखंडे यांच्या खासगी उघड्या विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरत होते. या दूषित पाण्यामुळे गावातीलच दोघांचा मृत्यू ( Both died in the village ) झालेला आहे. ( People Lost Their lives of contaminated water )

In critical condition patient hospital
प्रकृती चिंताजनक रुग्ण रुग्णालयात
author img

By

Published : Jul 8, 2022, 9:45 AM IST

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ( in Chikhaldara taluka of Amravati ) तालुक्यातील पाचडोंगरी गावात ( In Pachdongari village ) दूषित पाणी पिल्यामुळे ( Drinking contaminated water ) २ जणांचा मृत्यू झाला असून, अंदाजे ५० ते ६० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मेळघाटात पाणीपुरवठा विभागात होणारे निकृष्ट दर्जाचे काम ( Durty Work ) व भ्रष्टाचार ( Corruption in Water Supply ) यामुळे मेळघाटातील जनतेला आपले प्राणसुद्धा गमवावे लागत असताना मात्र काही अधिकारी मागील अनेक वर्षापासून खुर्चीवर कायम आहेत. भ्रष्टाचाराच्या किडीने मेळघाटातील दोन आदिवासींचे जीव घेतल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील पाचाडोंगरी येथे घडल्याची समोर आली आहे. दोघेही दूषित पाणी पिल्याने मरण पावल्याचे समोर आले असून, ( People Lost Their lives of contaminated water ) असे असताना मात्र प्रशासन सुस्त असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त : चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पाच डोंगरी गावाचा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद असल्यामुळे गावकरी गावातीलच रज्जी भानू अखंडे यांच्या खासगी उघड्या विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरत होते. ही विहीर पूर्णपणे उघडी असून कोणत्याही प्रकारचे शुद्धीकरण झालेले नाही. या दूषित पाण्यामुळे गावातीलच गंगाराम नंदराम धिकार (वय 25) व सविता सहदेव अखंडे (वय 30 ) या दोघाचा मृत्यू झालेला आहे.

प्रकृती चिंताजनक असलेल्यांची नावे : तर सहदेव रामजी अखंडे, मानकू रामजी अखंडे, भगवती रवी अखंडे, काडमी छोटेलाल धांडे, संतोष छोटेलाल धांडे, साधना संतोष धांडे, भुता सुकलाल कासदेकर, कोलाई भुता कासदेकर, गंगाराम ओमकार तोटा, जानकी पांडू अखंडे, बुधिया कालू जामुनकर, राणू लालमन जामुनकर, शांता रानु जामुनकर, सुकाराम रोंगे अखंडे, रामकली सुरेश अखंडे, शिवम बाबुराव कासदेकर, बाबू कासदेकर, नंदू बाबू कासदेकर, माला बंशी अखंडे, दया दयाराम कासदेकर, आशा नंदराम धिकार अंकिता संतोष धांडे, काली नंदराम अधिकार, रुख्मी गंगाराम अधिकार पिकला नंदराम धिकार, झापिया दयाराम कासदेकर, आयुष राजाराम अखंडे अशा एकूण २० नागरिकांची प्रकृती दूषित पाण्याने खालावली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात केले भरती : प्रकृती चिंताजन असल्याने सर्व नागरिकांना चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही गावकरी उपजिल्हा रुग्णालय चुरणी येथे पोहोचू शकत नसल्याने, त्यांचा उपचार पाचडोंगरी गावातच करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे. या घटनेमुळे चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा निकृष्ट नियोजन व प्रशासनाची पोलखोल झाल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहे.

पिण्याच्या पाण्याचे नियोजन निकृष्ट, नागरिकांचा आरोप : चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा निकृष्ट नियोजन व प्रशासनाची पोलखोल झाल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहे. तर पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. खडीमाल येथे कार्यरत असलेले वादग्रस्त ग्रामसेवक विनोद सोळंके यांना आता कोयलारी ग्रामपंचायत देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, विनोद सोळंके हे मागील पंधरा दिवसांपासून बेपत्ता असून संबंधित ग्रामसेवकाला नागरिकांनी पाणीपुरवठा योजना बंद असल्याचे माहिती वारंवार दिल्यानंतरसुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ग्रामसेवक सोळंके बेपत्ता : अद्यापि सोळंके हे बेपत्ता असल्याची माहिती आहे. वादग्रस्त ग्रामसेवक सोळंके यांनी पाणीपुरवठा योजनेच्या नावावर खडीमल येथे लाखोंचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असून, स्वतः सरपंचाने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे, असे असताना सोळंके यांना निलंबित न करता कोयलारी ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती दिल्याने सोळंके यांचे वरिष्ठांपर्यंत लॉबिंग मजबूत असल्याची दबंग चर्चा आता सामान्य जनता करताना दिसत आहे.

ग्रामसेवकांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी : मेळघाटात पाणीपुरवठा विभागामध्ये निकृष्ट काम आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे. ग्रामसेवकांसह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर कलम 302 चा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तेव्हाच मेळघाटात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे डोळे उघडतील आणि भ्रष्टाचारवर काही प्रमाणात आळा बसेल, अशी मागणी तालुक्यातील मेळघाटातील आदिवासींकडून होत आहे.

हेही वाचा : Dead Bodies found in Vena River : वेणा नदीत आढळला युवक युवतीचा मृतदेह; दगडाला दोरीने हातपाय बांधून फेकले होते नदीत

हेही वाचा : Decision on sharjeel imam bail: दिल्ली हिंसा प्रकरणातील राजद्रोहाचा आरोपी शर्जील इमामच्या जामीनावर आज निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.