ETV Bharat / city

अमरावतीत कोरोनाबाधितांचा आकडा 84 वर...

author img

By

Published : May 12, 2020, 9:44 AM IST

कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून 78 असल्याने आता अमरावतीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली असे वाटत असताना, सोमवारी कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आल्याने अमरावतीत पुन्हा खळबळ उडाली आहे.

corona virus
corona virus

अमरावती - सोमवारी 6 कोरोनाग्रस्त आढळून आले असून अमरावतीत आता कोरोना रुग्णांची संख्या 84 वर पोहचली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून 78 असल्याने आता अमरावतीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली असे वाटत असताना, सोमवारी कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आल्याने अमरावतीत पुन्हा खळबळ उडाली आहे.

सोमवारी ज्या नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, त्यापैकी एक व्यक्ती गवळीपुरा येथील असून त्याचे वय 70 आहे. तसेच खोलपुरी गेट परिसरातील 35 वर्षीय महिला, मासानगंज पाठवापुरा येथील 38 आणि 52 वर्षीय महिला तसेच मासानगंज परिसरातील 35 आणि 45 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी अमरावतीत जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यावर सोमवारी जणू लॉकडाऊन संपला अशी गर्दी शहरात झाली होती. शहरात वाढणाऱ्या गर्दीवर आता कोणाचेही नियंत्रण नसताना कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने अमरावतीत कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.