ETV Bharat / city

Contaminated Water in Melghat : खासदार नवनीत राणा मेळघाटातील गावात; दूषित पाणी पिल्याने झाला तिघांचा मृत्यू - खासदार नवनीत राणा

मेळघाटात 100 पेक्षा अधिक जण गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त आहेत. मीण रुग्णालय ( Rural Hospital ) आणि गावातील जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) शाळेत आरोग्य विभागाच्या ( Department of Health ) वतीने त्यांच्यावर उपचार केले जात असताना खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी पाच डोंगरी गावाला भेट दिली.

खासदार नवनीत राणा मेघाटातील पाच डोंगरी गावात पोहोचल्या

author img

By

Published : Jul 9, 2022, 7:58 AM IST

अमरावती - मेळघाटातील ( Melghat ) चिखलदरा तालुक्यातील ग्रामपंचायत ( Gram Panchayat ) अंतर्गत येणाऱ्या पाच डोंगरी येथे शेतातील खुल्या विहिरीचे पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा अधिक आदिवासींना विषबाधा झाली आहे. चुरणी ग्रामीण रुग्णालय ( Rural Hospital ) आणि गावातील जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) शाळेत आरोग्य विभागाच्या ( Department of Health ) वतीने त्यांच्यावर उपचार केले जात असताना खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी पाच डोंगरी गावाला भेट देऊन आजारी पडलेल्या आदिवासी बांधवांची चौकशी केली आहे. तसेच प्रशासनाला ( Administration ) योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

खासदार नवनीत राणा मेघाटातील पाच डोंगरी गावात पोहोचल्या

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद - मेघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या पाच डोंगरी कोयलारी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने या दोन्ही गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. यामुळे तहान भागवण्यासाठी गावालगत असणाऱ्या खराब पाण्याच्या साठ्यावर आदिवासी बांधव अनेक दिवसांपासून तहान भागवीत आहे. या खराब पाण्यामुळे आदिवासी बांधवांना विषबाधा झाली आहे. यामध्ये 100 पेक्षा अधिक जण गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त आहेत. ही गंभीर बाब समोर आल्यावर खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा प्रशासनाला या भागात आरोग्य पथक पाठविण्याचे निर्देश दिले होते.

तिघांचा मृत्यू ही दुर्दैवी बाब - पाच डोंगरी गावात खासदार पोहोचले, त्यांनी गावातील भीषण परिस्थितीची पाहणी केली. पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नसल्याने तिघांचा मृत्यू होणे, ही अतिशय गंभीर बाब असून 100 पेक्षा अधिक जण अशुद्ध पाणी पिल्यामुळे आजारी आहे. ही घटना अतिशय धक्कादायक असून, आरोग्य यंत्रणेने आदिवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी युद्धपातळीवर हवे ते सर्व प्रयत्न करावे असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. ज्या आदिवासी बांधवांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, त्यांना तातडीने उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात यावे असे निर्देश देखील खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. मेळघाटात गेल्या 50 वर्षात योग्य अशा सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. आता सुद्धा या भागात योग्य सुविधा पुरविणे सहज शक्य नसले, तरी लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि या परिसरातील आमदार मेघाटातील आदिवासी बांधवांना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यास प्रयत्न करत आहोत, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. खासदार नवनीत राणा या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह पाच डोंगरी गावात पोहोचले आहेत.

20 जण गंभीर - दूषित पाणी पिल्यामुळे या तिन्ही गावातील एकूण 50 जणांना विषबाधा झाली असून यापैकी 20 जण अति गंभीर आहे. या 20 ही जणांवर चूर्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अमरावती वरून वैद्यकीय पथक या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. 30 जणांवर काट कुंभ आणि पचडोंगरी या गावात उपचार सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - MLA Aditya Thackeray : शरद पवारांनी शिवसेनेला संपवल्याचा आरोप; वाचा काय म्हणाले आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.