ETV Bharat / city

Supriya Sule Reaction : देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे संतापल्या - खासदार संजय राऊत

देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi Maharashtra Tour ) यांच्या हस्ते आयोजित संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे भाषण प्रोटोकॉलनुसार होणे गरजेचे होते. मात्र, या सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना भाषणाची संधी मिळते. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे भाषण पंतप्रधान कार्यालयाकडून नाकारले जाते ही अतिशय दुर्दैवी बाब असून हा प्रकार महाराष्ट्राचा अपमान करणारा आहे, टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 14, 2022, 4:46 PM IST

Updated : Jun 14, 2022, 5:03 PM IST

अमरावती - देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi Maharashtra Tour ) यांच्या हस्ते आयोजित संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे भाषण प्रोटोकॉलनुसार होणे गरजेचे होते. मात्र, या सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना भाषणाची संधी मिळते. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे भाषण पंतप्रधान कार्यालयाकडून नाकारले जाते ही अतिशय दुर्दैवी बाब असून हा प्रकार महाराष्ट्राचा अपमान करणारा आहे, टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

पालकमंत्री या नात्याने अजित पवारांनी केले पंतप्रधानांचे स्वागत - देशाचे पंतप्रधान आपल्या मतदारसंघात येत असल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. देहू येथे आयोजित सोहळ्यात पंतप्रधान सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषणही होणार होते. या सोहळ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होणे अपेक्षित असताना पंतप्रधान कार्यालयाकडून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाषण रद्द केले जाते आणि विरोधी विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाला परवानगी मिळते ही संतापजनक बाब असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही - आमचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी ( Presidential Election 2022 ) अजिबात इच्छुक नाही. तसेच खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आता खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, असे जरी म्हटले असले तरी शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असून राष्ट्रपतीपदाची निवडणूक शरद पवार लढवणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार, अमिताभ बच्चन अन् धोनी माझे आदर्श - कितीही संकट असो किंवा अपयश असो मात्र आपण संयम बाळगायचे अजिबात खायचे नाही हे गुण शरद पवार, अमिताभ बच्चन आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या मध्ये मी पाहिले आहे. यामुळे अपयश आले तरी हसायचे नाही हा आदर्श मी या तिघांकडून माझ्या जीवनात अंगीकारला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

स्कायवॉकचा प्रश्न खासदार नवनीत राणा करून समजून घेणार - अमरावती शहर आणि जिल्ह्यातील विविध समस्या, अडचणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी पत्रकारांकडून जाणून घेतल्या. चिखलदरा येथे होत असलेल्या स्कायवॉकचे काम रखडले आहे. देशातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून हा कसा काय रखडला यामागे नेमके काय कारण आहे आणि स्काय वॉक बनण्याचा मार्ग कसा सुकर होईल याबाबात मी दिल्लीला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून समजून घेणार, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - संजय राऊत यांच्याबाबत आमची कुठलीच नाराज नाही : खासदार सुप्रिया सुळे

Last Updated : Jun 14, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.