ETV Bharat / city

18th State Childrens Drama Competition : अमरावतीत दोन वर्षानंतर रंगली 'राज्य बालनाट्य स्पर्धा'; मुलांमध्ये उत्साह - राज्य बालनाट्य स्पर्धा 2022

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 18व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे ( 18th Maharashtra Childrens Drama Competition ) आज जागतिक बाल रंगभूमी दिनाच्या पर्वावर अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे थाटात उद्घाटन झाले.

18th State Childrens Drama Competition
18th State Childrens Drama Competition
author img

By

Published : Mar 20, 2022, 7:14 PM IST

अमरावती - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 18व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे ( 18th Maharashtra Childrens Drama Competition ) आज जागतिक बाल रंगभूमी दिनाच्या पर्वावर अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन ( Sant Dnyaneshwar Sanskrutik Bhavan ) येथे थाटात उद्घाटन झाले. कोरोनामुळे सलग दोन वर्ष बालनाट्य स्पर्धा होऊ शकली नाही. दोन वर्षाच्या अंतरानंतर आज रंगलेल्या बालनाट्य स्पर्धेत बाल कलावंतांचा उत्साह झळकत होता.

प्रतिक्रिया

बाल कलावंत पयोश्णी ठाकूरच्या हस्ते उद्घाटन -

बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन सतराव्या बालनाट्य स्पर्धेतील रौप्य पदक विजेती बाल कलावंत पयोश्णी ठाकूर हिच्या हस्ते करण्यात आले. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे हे उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात बाल कलावंत विविध वेशभूषा करून सजले होते. दोन वर्षानंतर आम्हाला बालनाट्य करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद स्वेहा तराळ याच चिमुकलीने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला. अमरावतीकर नाट्यरसिकांनी बालनाट्य स्पर्धेलाही मोठ्या संख्येने हजेरी लाऊन पाल कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन बाल नाट्य स्पर्धेचे आयोजक एड. प्रशांत देशपांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले.

पहिल्या दिवशी सहा नाटकं -

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आज 18 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 'बुलेट ट्रेन', 'खेळ मदारी वाल्याचा', 'उजबोगा', 'बाहुली','जैसा राजा तैसी प्रजा' आणि 'आळशी राजू'अशी सहा नाटकं सादर करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 17 नाटक सादर होणार आहेत.

हेही वाचा - Sudhir Mungantiwar Critisized Shivsena : 'एमआयएम भाजपची बी टीम असेल, तर शिवसेना ही काँग्रेसची बी टीम'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.