अमरावती - हिंगोलीचे आमदार आणि शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांच्या ताफ्यावर अंजनगाव सुर्जी येथे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर आता शिंदे समर्थक शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Shinde Thackeray group) दरम्यान, आमदार बांगर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि बहीण असताना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी केलेला हल्ला निंदनीय असल्याचे गोपाल अरबट यांनी म्हटले असून आम्ही दोन दिवसांपूर्वी सातशेच्या वर शिवसैनिकांची सभा घेतली. मात्र, आमच्या विरोधात कोणीही आवाज काढला नाही असे देखील गोपाल अरबट म्हटले आहेत.
मी अंजनगावला माझी बहीण व पत्नीसह देवदर्शनासाठी आलो होतो. चौकात काही लोकांनी भ्याड हल्ला केला. यांना शिवसैनीक म्हणता येत नाही. शिवसैनीक छातीवरती वार करतो. त्यांना माझे आव्हान आहे, कधी दिवशी यायचे आणि कुठे यायचे हे सांगा, मी कोणत्याही चौकात उभा राहतो असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी या हल्ला करणाऱ्यांना दिले आहे.
हल्लेखोरांची नावे निष्पन्न - आमदार संतोष बांगर यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्याठाकरे गटातील शिवसैनिकांचेपपावर निष्पन्न झाले अशी माहिती अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे. हल्लेखोरांवर कारवाई करणार असे देखील पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी स्पष्ट केले.