अमरावती- अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक मोठा सल्ला दिला आहे. न्यायालयाने म्हटले की गाईला राष्ट्रीय पशू घोषित केले जावे. भारतात गाईला माता मानले जाते हिंदूंच्या श्रद्धेची ही बाब आहे. एखाद्या धर्माची आस्था दुखावल्याने देश कमकुवत होतो, असेही मत न्यायालयाने नोंदवले आहे. उत्तर प्रदेशातील गोहत्याबंदी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपी जावेद नावाच्या व्यक्तीला जामीन नाकारताना कोर्टाने ही टिप्पणी केली आहे.
गाईला मूलभूत हक्क देण्यावरून कोर्टाने ही महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. तसेच जेव्हा गायीचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल, त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचे न्यायालयाने सूचित केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने अमरावीत जिल्ह्यात असलेल्या गोशांळाची पाहणी करून सध्या तेथील गाईंची काय परिस्थिती आहे, त्यांचा कशा प्रकारे सांभाळ केला जातो. हिंदू धर्माची देवता असलेल्या या गाईला कत्तलीसाठी न पाठवता गोशाळेत पाठवले जाते. त्यामुळे गोशाळेत गायींची सुरक्षा आणि सांभाळ कशा प्रकारे केला जातो, यासाठी सार्शी येथील गोशाळेतली वस्तूस्थिती जाणून घेतली आहे, त्यावरचा हा विशेष वृत्तांत
जनावरांची नियमितपणे देखभाल
कत्तलीपासून सुटका झालेल्या जनावरांना या गोशाळेत आणल्यानंतर त्यांना याच ठिकाणी खाद्य पुरवले जाते, या ठिकाणी या जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था, देखभाल नियमितपणे करण्यात येते. या जनावरांना सकाळी दहा वाजता जंगलामध्ये चारायला नेलं जातं त्यानंतर सायंकाळी त्यांना चारून पुन्हा गोशाळेत आणले जाते. तसेच गोशाळेत या जनावरांसाठी खाद्य म्हणून दरवर्षी 15 ट्रॅक्टर कुटार खाद्य भरल जाते असल्याचा दावा येथील व्यवस्थापकांनी केला आहे. परंतू सध्य स्थितीत या ठिकाणी या जनावरांना काही दिवस पुरेल इतकंच खाद्य शिल्लक आहे. याबाबत विचारणा केली असता, सध्या पावसाळ्यात जनावारंना बाहेर चरायला सोडले जात आहे. हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वाळलेल्या वैरणीची गरज नसल्याची माहिती या व्यवस्थापकांनी दिली.
जनावरांसाठी अपुरा निवारा -
मागील दोन वर्षात या गोशाळेत एकाही गाईचा मृत्यू झाला नसल्याचा दावा व्यवस्थापकाने केला आहे. सोबतच एखादं जनावर आजारी पडलं तर त्यावर तत्काळ जनावरांच्या डॉक्टरांकडून उपचार केले जातात. परंतु गोशाळेत सध्या उपलब्ध जनावरांच्या तुलनेत जागेची कमतरा आहे. जनावरांना मोकळेपणाने संचार करता येत नाही. तसेच पाऊस आल्यास म्हणावा आसरा या ठिकाणी दिसून आला नाही. त्यामुळे जनावरांना चारा खाण्यासाठी अडचणी निर्माण होतात, तसेच जनावर आजारी पडण्याची शक्यता बळावते.