ETV Bharat / city

Ravi Rana Bail Granted : मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण, आमदार राणा यांना जामीन मंजूर - रवी राणा जामीन अपडेट

महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर ( Praveen Astikar Ink Thrown Case ) यांच्यावर राजापेठ भुयारी मार्ग परिसरात 9 फेब्रुवारी रोजी शाई फेक केल्याच्या प्रकरणात आरोपी असणारे आमदार रवी राणा ( Ravi Rana Pre Arrest Bail granted By District Court ) यांचा अटकपूर्व जामीन शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.

Praveen Astikar Ink Thrown Case
Praveen Astikar Ink Thrown Case
author img

By

Published : Mar 5, 2022, 8:01 PM IST

अमरावती - अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर ( Praveen Astikar Ink Thrown Case ) यांच्यावर राजापेठ भुयारी मार्ग परिसरात 9 फेब्रुवारी रोजी शाई फेक केल्याच्या प्रकरणात आरोपी असणारे बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा ( Ravi Rana Bail Plea Accepted By District Court ) यांचा अटकपूर्व जामीन शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण -

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 12 जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता बसविलेला हा पुतळा महापालिका प्रशासनाने 16 जानेवारी रोजी काढून टाकला होता. महापालिका प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते आणि महापालिका प्रशासन यामध्ये वाद उफाळून आला होता. दरम्यान आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना 9 फेब्रुवारी रोजी राजापेठ भुयारी मार्ग परिसरात साचणाऱ्या पाण्यासंदर्भात तक्रार करून भुयारी मार्ग पाहण्यासाठी येण्याची विनंती केली होती. महापालिका आयुक्तांनी राजापेठ भुयारी मार्ग परिसरात महापालिकेच्या अभियंत्यांना पाठविले होते. मात्र, आयुक्तांनी स्वतः राजापेठ भुयारी मार्ग परिसरात यावे, असे युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. भुयारी मार्गाची पाहणी करण्याकरिता महापालिका आयुक्त आले असता त्यांच्यावर युवा स्वाभिमान संघटनेच्या तीन महिलांनी शाई फेकली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक केली होती, तर शाईफेक करणाऱ्या महिला अद्यापही फरार आहेत. आमदार रवी राणा हेसुद्धा अनेक दिवस अमरावती बाहेरच होते. दरम्यान आमदार रवी राणा यांना सर्वोच्च न्यायालयातून बेल मिळवल्यावर 24 फेब्रुवारीला ते अमरावती परतले.

अटकपूर्व जामिनासाठी दाखल केली होती याचिका -

महापालिका आयुक्तांवर शाईफ़ेक केल्या प्रकरणात आरोपी असणारे आमदार रवी राणा यांनी सर्वोच्च न्यायालयातून ट्रान्झिट बेल मिळाल्यावर अटकपूर्व जामिनासाठी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी जोशी यांनी ही याचिका मंजूर केली. आमदार रवी राणा यांच्यावतीने प्रशांत देशपांडे, मोहित जैन , चंदू गुळसुंदरे, महेश करुले या वकिलांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा - Disha Salian Case : मालवणी पोलीस ठाण्यात राणे पितापुत्रांची तब्बल 5 तासांपासून चौकशी; पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.