अमरावती- अमरावती शहर 12 आणि 13 नोव्हेंबरच्या हिंसक आंदोलनांमुळे (Amravati violence) अशांत झालेल्या शहरामधील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. हिंसाचारदरम्यान झालेले नुकसान, लूटमारीविरोधात पोलिसांनी एकूण ५७ गुन्हे दाखल केले आहेत. या ५७ गुन्ह्यांमध्ये ३१५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह (Amarvati Police commissioner Arati Singh) यांनी दिली.
शहरात मागील आठवड्यात त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट संघटनांनी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपने केलेल्या मोर्चांदरम्यान हिंसचार झाला होता. यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. सध्या, शहरातील व्यवहार सुरळीत झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.
हेही वाचा-Amravati Violence : परिस्थिती पाहून संचारबंदी व इंटरनेटबाबद निर्णय घेणार - अतिरिक्त पोलीस महासंचालक
सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत व्यवहार सुरू
अमरावती शहरातील परिस्थिती सर्वसामान्य झाली आहे. सकाळच्या वेळेतील दैनंदिन व्यवहार सुरुळीत सुरू आहेत. शहरामधील परिस्थिती पाहता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह दिली.
अमरावती हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू-
अमरावतील झालेल्या हिंसेनंतर दोन दिवस वातावरण कलुष्कीत झाले होते. आता अमरावती शांत झाली असून तिला शांतच राहू दे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसावले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असून हिंसेबाबत भडकावू विधान केले होते. पालकमंत्री ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला.