ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खासदार नवनीत राणांना फोन, परिस्थितीचा घेतला आढावा - pm narendra modi contact to mp navnit rana

सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. अमरावती जिल्हा ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये आला आहे. जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे, हे सांगताच पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.

mp navnit rana
mp navnit rana
author img

By

Published : Apr 27, 2020, 10:12 AM IST

Updated : Apr 27, 2020, 1:31 PM IST

अमरावती - शनिवारी (25 एप्रिल) रात्री 10 वाजून 31 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून संवाद साधला. खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधानांना जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यपरिस्थिती विशद केली.

पंतप्रधानांनी उचललेल्या लॉकडाऊनसारख्या कठोर पावलांमुळेच देशातील कोरोना नियंत्रणात आहे. अमेरिकेने केलेला विलंब बघता त्यांची जी दैन्यावस्था झाली ती किमान भारताची झाली नाही, हे केवळ पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे शक्य झाल्याचे राणा म्हणाल्या. ज्या पद्धतीने केंद्रीय आरोग्य पाहणी पथक पुणे, मुंबई येथे आले, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात पाठवावे जेणेकरून वास्तविक स्थितीचा आढावा व योग्य आकडेवारी समोर येईल व आवश्यक त्या उपाययोजना करता येईल, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. अमरावती जिल्हा ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये आला आहे. जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे, हे सांगताच पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. तसेच डॉक्टर्सप्रमाणे आपत्कालीन सेवा देणारे पोलीस, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, पत्रकार यांना 50 लाख रुपयांचा सुरक्षा विमा देण्यात यावा, अशीही मागणी केली.

पंतप्रधानांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या प्रकृतीची चौकशी केली व काळजी घेण्याचे सुचवले. यावेळी खासदार नवनीत रवी राणा यांनी आपण या लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात म्हणून हजारो गोरगरीब गरजूंना किराणा, धान्य वाटप करत असल्याचे सांगितले. त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

Last Updated : Apr 27, 2020, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.