ETV Bharat / city

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी स्वॅब टेस्टिंग वाढविण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

मुंबई आणि राज्यात सर्वत्र स्वॅब टेस्टिंग कमी करण्यात आल्यामुळे हा आकडा कमी दिसत आहे. दिल्लीत 21 हजार कोरोना रुग्ण रविवारी आढळले आहेत. दिल्लीप्रमाणे आपल्याकडे स्वॅब टेस्टिंग अधिकाधिक करणे आवश्यक आहे. अमरावती विभागात सुद्धा स्वॅब टेस्टिंग वाढविण्यात यावी असे विभागीय आयुक्तांशी बोलल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 29, 2020, 7:53 PM IST

Updated : Jun 29, 2020, 8:17 PM IST

अमरावती - कोरोनावर जोपर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोना संबंधित व्यवस्थापन करूनच जगावे लागणार आहे. खरे तर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात स्वॅब टेस्टिंग वाढवणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत व्यक्त केले.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी स्वॅब टेस्टिंग वाढविण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

अमरावती जिल्हा आणि विभागात कोरोनाची नेमकी परिस्थिती कशी आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी फडणवीस सोमवारी अमरावतीत आले होते. विदर्भ महाविद्यालय येथील विलगिकरण केंद्र, कोविड रुग्णालयाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्याकडून अमरावती विभागात कोरोना संबंधित त्यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र्रात रविवारी 5 हजार 300 कोरोना रुग्ण आढळले. मुंबई आणि राज्यात सर्वत्र स्वॅब टेस्टिंग कमी करण्यात आल्यामुळे हा आकडा कमी दिसत आहे. दिल्लीत 21 हजार कोरोना रुग्ण रविवारी आढळले आहेत. दिल्लीप्रमाणे आपल्याकडे स्वॅब टेस्टिंग अधिकाधिक करणे आवश्यक आहे. अमरावती विभागात सुद्धा स्वॅब टेस्टिंग वाढविण्यात यावी असे मी विभागीय आयुक्तांशी बोलल्याचे फडणवीस म्हणाले. विविध राज्य आणि जिल्ह्यातील लोक अमरावती, अकोल्यात येत असल्याने या दोन जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपण आता क्रिटिकल अवस्थेत आलो असून स्वॅब टेस्टिंग वाढविणे आवश्यक आहे. सोबतच इतर जिल्हा आणि राज्यातून आलेल्या लोकांना विलगिकरण कक्षात ठेवले तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

कापूस खरेदी करण्यास सरकार अपयशी

केंद्र सरकार संपूर्ण कापूस खरेदी करण्यास तयार आहे. यासाठी 5700 कोटी रुपये राज्य सरकारला देण्यात आले आहे. असे असताना वारंवार खरेदीची मुदतवाढ देऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्री, पणनमंत्री यांना शेतकऱ्यांच्या अडचणी संगितल्या. केंद्रीय कपडा मंत्री स्मृती इराणी यांनी सुद्धा राज्य सरकारला पत्र दिले. तरीही राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाईसोबतच शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे फडणवीस म्हणाले.

सरसकट आलेले तीन महिन्याचे वीज बिल हा अन्याय असून त्यांना हफ्ते पाडून देऊ आणि सावकारी वसुली करणार नाही, असे ऊर्जा मंत्री म्हणाले होते. आता मात्र त्यांना त्यांच्या बोलण्याचा विसर पडला, अशी टीका करत फडणवीस यांनी केली. दीर्घ मुदतीचे हफ्ते देऊन वीज बिलामध्ये सवलत देण्याची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पत्रकार परिषदेला अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, भजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातूरकर आदी उपस्थित होते.

Last Updated : Jun 29, 2020, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.