ETV Bharat / city

विद्यार्थी नेता उमर खालिद चांदूर रेल्वे येथील #CAA #NRC निषेध रॅलीत होणार सहभागी - #CAA #NRC निषेध रॅली

जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद, रविवारी अमरावतीतील चांदूर रेल्वे येथे NRC आणि CAA कायद्याच्या निषेधार्थ होणाऱ्या रॅलीत सहभागी होणार आहे.

Umar Khalid
उमर खालिद
author img

By

Published : Jan 11, 2020, 8:20 PM IST

अमरावती - केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात रविवारी रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील अल्पसंख्यांक समुदायाप्रमाणेच सर्व सामाजाच्या नागिकांचा या रॅलीत समावेश होणार आहे. शहरातील काझीपुरा येथुन रविवारी दुपारी २ वाजता ही निषेध रॅली काढण्यात येणार आहे.

हेही वाचा... #Article 370: मोदी-शाहांनी दिली होती 'ऑफर'; झाकिर नाईकचा खळबळजनक दावा

चांदुर रेल्वे शहरात होणाऱ्या या रॅलीत, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयु) विद्यार्थी नेता उमर खालिद हा प्रामुख्याने सहभागी होणार आहे. त्यामुळे या रॅलीला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... एटीएममधून १०० रुपयाऐवजी निघाल्या ५०० रुपयांच्या नोटा, अन्...

रॅलीनंतर एनआरसी आणि सीएए विरोधात विविध पक्ष, संघटनांतर्फे सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभा आयोजीत करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता आयोजित या लोकजागर सभेत उमर खालिद याचे भाषण होणार आहे. तसेच याठिकाणी कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड सुध्दा उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हे दोघे नेते नेमके सभेत काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Intro:जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद उद्या अमरावतीच्या चांदूर रेल्वेत

NRC - CAA च्या निषेधार्थ रॅलीत होणार सहभागी

अमरावती अँकर

केंद्र सरकारच्या नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात अल्पसंख्यांक समुदायातर्फे सर्वधर्माच्या लोकांचा समावेश करून काझीपुरा येथुन उद्या रविवारी दुपारी २ वाजता निषेध रॅली काढणार आहे. यामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) आंदोलनातील विद्यार्थी नेता उमर खालीद प्रामुख्याने सहभागी होणार असल्यामुळे या रॅलीत विदर्भातुन प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

या रॅलीनंतर एनआरसी - सीएए विरोधात विविध पक्ष, संघटनांतर्फे जि.प. शाळा, चांदूर रेल्वे येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित लोकजागर सभेमध्येही उमर खालीद ची तोफ कडाडणार आहे. याशिवाय याठिकाणी कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड सुध्दा उपस्थित असणार आहे. त्यामुळे हे दोघेही नेते नेमके या सभेतुन काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.