ETV Bharat / city

Nari Shakti : विदर्भातील ओडिसी नृत्य शैली पोहचली आंतरराष्ट्रीय स्तरावर - शितल मेटकर यांनी रुजवली ओडिसी नृत्यशैली

अमरावती शहरातील युवतीं हा ओडिसी नृत्य प्रकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर (reached the international level) सादर करीत आहेत. 'पंचायत राज प्रशिक्षण केंद्र' अमरावती येथे प्राचार्य पदावर असलेल्या, (Nari Shakti) शीतल मेटकर (Shital Metkar) यांनी अमरावती शहरात खऱ्या अर्थाने रुजवलेल्या 'ओडिसी नृत्य कलेच्या संस्कृतीमुळेच' (Odissi dance style) अनेक युवती या नृत्य प्रकारात प्रवीण झाल्या आहेत.

Nari Shakti
शीतल मेटकर
author img

By

Published : Aug 10, 2022, 1:04 AM IST

अमरावती : ओडिसी नृत्य (Odissi dance style) ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा या ओडिसी नृत्याचा विशेष भाग होय. यामध्ये 'त्रिभंग' स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओडिशा मधील उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. तर विदर्भात, अमरावती शहरातील युवतीं हा ओडिसी नृत्य प्रकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर (reached the international level) सादर करीत आहेत. 'पंचायत राज प्रशिक्षण केंद्र' अमरावती येथे प्राचार्य पदावर असलेल्या, (Nari Shakti) शीतल मेटकर (Shital Metkar) यांनी अमरावती शहरात खऱ्या अर्थाने रुजवलेल्या 'ओडिसी नृत्य कलेच्या संस्कृतीमुळेच' अनेक युवती या नृत्य प्रकारात प्रवीण झाल्या आहेत.

प्रतिक्रीया देतांना नृत्य शिक्षिका शितल मेटकर

शितल मेटकर यांचा नृत्य क्षेत्रातील प्रवास : बालपणी जिल्ह्यातील मोर्शी येथे शासकीय शाळेत शिक्षण घेत असताना दूरदर्शनवर कोणीतरी वाद्य वाजवत आहे आणि त्यावर युवती नृत्य करीत आहे. हा प्रकार सातत्याने पाहून नृत्याबाबत मला आवड निर्माण झाली, अशी माहीती शितल मेटकरी यांनी ईटीव्ही भारतला दिली. इयत्ता नववीत असतांना पूर्वाश्रमीच्या शीतल वाटाणे असणाऱ्या, शितल मेतकर या अमरावतीत आल्या आणि भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी त्यांना 'हेमंत नृत्यकला मंदिर' येथे सहज म्हणून, ओडिसी नृत्य शिकायला पाठविले. आणि येथूनच शितल मेटकर यांचा ओडिसी नृत्याचा दीर्घ प्रवास सुरू झाला. सुरुवातीला देशभरात आयोजित विविध स्पर्धेत शितल मेटकर यांनी नृत्य सादर केले. वकिलीचे शिक्षण घेत असतांना, त्यांनी मुंबईत सादर केलेल्या नृत्य प्रकाराबाबत, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. आणि येथुनच ओडिसी नृत्य आपल्या आयुष्यात कायम ठेवावे असा ठाम निश्चय त्यांनी केला. वकिलीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे यदुराज मेटकर यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर माजी आमदार असणारे सासरे बबनराव मेटकर आणि सासूबाईंनी ओडिसी नृत्य सुरूच ठेव, असे प्रोत्साहन दिल्यावर 2002 मध्ये त्यांनी 'उत्कल कलानिकेतन' ची स्थापना केली. सुरुवातीला केवळ तीन-चार मुली ओडिसी नृत्य शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत होत्या. हळूहळू मुलींची संख्या वाढली. मधल्या काळात मुले झाल्यामुळे, काही वर्ष उत्कल कलानिकेतन बंद होते. 2014 पासून मात्र नव्या दमाने उत्कल कला निकेतन येथे युवती ओडीसी नृत्य प्रकार शिकायला आल्या. आज एकूण अमरावती शहरातील पाचशेच्या वर युवतींनी, शितल मेटकर यांच्या मार्गदर्शनात ओडिसी नृत्य प्रकार शिकला आहे. विशेष म्हणजे आपली कलाही आपल्याकडे शिकणाऱ्या मुलींच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी; यासाठी शितल मेटकर यांचे सतत प्रयत्न राहिले आहेत.

2014 पासून घेतली भरारी : एका मैत्रिणीने पहिल्यांदाच अमरावती शहराबाहेर ओडिसी नृत्य कसे आहे, याचा परिचय करून दिला आणि यानंतर अमरावतीच्या बाहेर ओडिसी नृत्याचे जग कळायला लागले. 2017 मध्ये 'उत्कल कलानिकेतन' येथील ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुलींच्या चमूने सह्याद्री वाहिनीवर आपली नृत्य सादर केले. ओडिसी नृत्य हे महाराष्ट्राच्या मातीतल्या साहित्याशी जोडून; त्याचे वेगळे स्वरूप सगळ्यांसमोर मांडण्याचा नवा प्रयोग शितल मेटकर यांनी केला. यासोबतच बंगाली भाषेतील एकला चलो रे, गुजराती भाषेतील भजन, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सदा सुखी हो भारत देश हमारा, अशा प्रार्थनांवर ओडिसी नृत्य विविध ठिकाणी सादर करण्यात आले आणि या नव्या प्रकाराला मिळालेला प्रतिसाद माझ्यासह माझ्या विद्यार्थिनींना नवी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरला, असे शितल मेटकर म्हणतात.

अमरावती आंतरराष्ट्रीय डान्स फेस्टिवल : ओडिसी नृत्य प्रकार हा नव्या पिढीतील युतीमध्ये रुजावा या हेतूने 2018 मध्ये 'संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ' तसेच आमच्या 'शिखर फाउंडेशन' च्या वतीने तीन दिवसीय 'इंडियन इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल' आयोजित करण्यात आला होता. या फेस्टिवल मध्ये अमेरिका आणि रशिया येथून ओडिसी नृत्य कलावंत सहभागी झाले होते. आमच्या अमरावतीच्या मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दालन उपलब्ध होत असल्यामुळे; मोठी प्रेरणा मिळते असे देखील; शितल मेटकर सांगतात.

स्वहितापेक्षा युवतींच्या भवितव्याला प्राधान्य : माझ्याकडे ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुली ह्या माझ्याकडेच राहाव्या किंवा माझ्यासोबतच त्यांनी विविध ठिकाणी सादरीकरण करावे, असा हेतू माझा कधीही नसतो. खरंतर अमरावती शहराच्या विविध भागात ओडिसी नृत्य शिकविणाऱ्या संस्था सुरू व्हाव्यात, अशीच माझी ईच्छा आहे. उच्च शिक्षणानिमित्त अनेक मुलींना पुणे, मुंबई, बंगलोर अशा शहरांमध्ये जावे लागते. अशावेळी त्यांच्या भवितव्याच्या आड नृत्यकला येऊ नये, याचे देखील भान मी राखते. मात्र ज्या युवतींनी ओडिसी नृत्य कला शिकली आहे; त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच नाचत रहावे आणि आनंदी राहावे. हाच माझा त्यांना प्रांजळ संदेश असतो, असे देखील शितल मेटकर म्हणतात.

हेही वाचा : CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रचला इतिहास; 200 सुवर्णपदके जिंकणारा ठरला चौथा देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.