नवी दिल्ली/अमरावती- अमरावती येथे धार्मिक शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी एका गटाने मोठ्या कट रचून हत्या केल्याचा एनआयएने आरोप केला आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder case ) यांची 21 जून रोजी झालेली निर्घृण हत्या ही भारतातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा आणि धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्याचा कट होता असे एनआयने एफआयरमध्ये म्हटले ( NIA FIR report on Amravati killing ) आहे.
अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात थेट इंटरनॅशनल कनेक्शन असण्याची शंका एनआयएच्या तपासात व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात एनआयएने एफ आयआर दाखल केली आहे. त्यातदेखील अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. हिंदू धर्मामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली असल्याचे म्हटले आहे
भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारे पोस्ट करणारे अमरावतीतील उमेश कोल्हे यांच्या हत्या करण्यात ( Umesh Kolhe murder Case ) आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये आज हजर करण्यात आले आहे. यावेळी या सर्व आरोपींना 15 जुलैपर्यंत एनआयए कोठडी देण्यात ( Umesh Kolhe murder Case Accused NIA Custody ) आली आहे.
एनआयएकडून कोठडीची मागणी - एनआयएने कोर्टात म्हटले की, या आरोपींची दहशतवादी संघटनेची संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासादरम्यान सापडले आहे. सध्या आरोपींची कोणत्या दहशतवादी संघटनेची संबंध आहे. या संदर्भात खुलासा करता येणार नाही मात्र या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो. याकरीता या सर्व आरोपींना 15 दिवसाची एनआयए कोठडी देण्यात यावी. या आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेची संबंधित UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हेंचा पीएम रिपोर्ट; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू, राज्यभरात अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन
सात जणांना झाली होती अटक - एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.
.
एनआयए करीत आहे युद्धपातळीवर तपास- उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांची चौकशी सुरू आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्यावतीने आर्थिक मदत केली गेली का याचा तपास देखील केला जात आहे. या संघटनेचा सोहेल नदवी व्यक्तीची देखील कसून चौकशी अमरावतीत होत आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरफान शेख रशीद याच्या रहेबर या संघटनेला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून आर्थिक मदत केली जात असल्याचेही समोर आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात अमरावती शहरातून आणखी अनेक जणांना एनआयए चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना मुंबईत हलविले, एनआयए न्यायालयासमोर हजर करणार
काय आहे प्रकरण? नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली