अमरावती अमरावती शहरात दर आठवड्याला खुणाच्या घटना घडत आहेत. शहरातील महिला युवती सुरक्षित नाही. आता गणपती विसर्जनादरम्यान Immersion of Ganpati शहरात नेमकी काय परिस्थिती राहील, या संदर्भात जिल्हाधिकारी आढावा बैठक Amravati Collector review meeting बोलवितात. मात्र, या आढावा बैठकीला पोलीस आयुक्त हजर राहत नाहीत, ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलीस आयुक्तांनी आमचे अमरावती शहर वाऱ्यावर सोडले आहे का? असा संतप्त सवाल angry question of MP Navneet Rana खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.
खासदार नवनीत राणा पोलीस उपायुक्तांवर भडकल्या आज जिल्हाधिकाऱ्यांनी गणपती विसर्जना संदर्भात शहरातील परिस्थिती नेमकी कशी राहील? याबाबत सर्व विभागाची बैठक बोलाविली होती. या बैठकीला पोलीस अधीक्षक अविनाश बारगड उपस्थित राहू शकतात. मग आपल्या कार्यालयातील दालनात बसलेल्या पोलीस आयुक्तांना, या बैठकीला येण्यास काय अडचण आहे? असा प्रश्न विचारीत खासदार नवनीत राणा MP Navneet Rana , या बैठकीला उपस्थित पोलीस उपायुक्त मकानदार यांच्यावर भडकल्या. पोलीस आयुक्तांच्या अशा वागण्या विरोधात त्यांना नोटीस पाठवावी. अशा सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मी सुद्धा वरिष्ठ पातळीवर त्यांची तक्रार करेल, असे खासदार नवनीत राणा बैठकीत बोलल्या.
जिल्ह्यात तीन दिवस काळेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश कोरोनामुळे सलग दोन वर्ष उत्सव सण जोमात साजरे झाले नाहीत. आता राज्यात आलेल्या नव्या सरकारने, संपूर्ण महाराष्ट्रात सर्व उत्सव धडाक्यात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा गणेशोत्सवा दरम्यान जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी उद्यापासून सलग तीन दिवस सर्वत्र कडे कोड बंदोबस्त ठेवावा, असे आदेश खासदार नवनीत राणा यांनी प्रशासनाला दिले. शहरातील छत्री तलाव, वडाळी परिसरातील प्रथमेश तलाव, यासह कोंडेश्वर तलाव, पेढे नदी या ठिकाणी 24 तास पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त ठेवावा. ग्रामीण भागात देखील गणेशोत्सवा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. बैठकीला बडनेरा चे आमदार रवी राणा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक आणि खासदार नवनीत राणा यांच्यात बाचाबाची - काही तासांपुर्वीच, पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा यांची आपल्या मोबाईल फोन मध्ये शूटिंग घेणे सुरू केले असतांना, खासदार नवनीत राणा यांनी माझी रेकॉर्डिंग का करता असा प्रश्न पोलीस निरीक्षकांना विचारला. यानंतर पोलीस निरीक्षक आणि खासदार नवनीत राणा यांच्या बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आक्रमक होत, पोलीस निरीक्षकांच्या जालनात असलेले भाजप आणि विश्व हिंदू परिषदेसह युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तसेच पत्रकारांना देखील बाहेर काढले. यानंतर सुमारे अर्धा तासापर्यंत खासदार नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू होती.