अमरावती : देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती देणारा अमरावती जिल्हा ( District in Amaravati ) हा उत्तम कामगिरीने नेहमीच चर्चेत असतो. अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण वरुड तालुक्यातील पुसला या खेड्यातील श्रावणी श्रीराव हीने भोपाळ येथे आयोजित नॅशनल रायफल शूटिंग या स्पर्धेत राज्यातून प्रथम तर देशातून पाचवा क्रमांक पटकावत जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
National Rifle Shooting : नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत अमरावतीच्या श्रावणीचे उज्ज्वल यश राज्यात पहिला क्रमांक - भोपाळ नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धा
अमरावतीमधील (Amravati) श्रावणीने नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत ( National Rifle Shooting Competition ) राज्यातून पहिला तर देशातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. श्रावणीने हे यश भोपाळ येथे आयोजित नॅशनल रायफल शूटिंग (National Rifle Shooting Competition Bhopal ) मिळवले आहे. या कामगिरीमुळे तिच्या महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. रायफल शूटिंग स्पर्धेसाठी प्रशिक्षक यशपाल दवंडे ( Coach Yashpal Davande ) यांनी तिच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली होती.
Shravani Vijay Shrirao