ETV Bharat / city

Navneet Rana अमरावतीत गोळीबारानंतर नवनीत राणांचे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप - अमरावती गोळीबार नवनीत राणा मराठी बातमी

अमरावती शहरात अशा घटना दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अमरावती शहरातील गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांचा कुठलाही धाक राहिला नाही, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला navneet rana angry on cp aarti singh आहे.

Navneet Rana aarti singh
Navneet Rana aarti singh
author img

By

Published : Aug 12, 2022, 9:31 PM IST

Updated : Aug 12, 2022, 9:44 PM IST

अमरावती - अमरावती शहरात पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार firing in amravati झाला. या गोळीबारात तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाली आहे. या घटनेनंतर खासदार नवनीत राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमरावतीच्या पोलीस आयुक्त म्हणून आरती सिंह या जेव्हापासून रुजू झाल्या त्या दिवसापासून अमरावती शहरात सातत्याने गुन्हे वाढत आहेत. आज देखील दोन गटात झालेल्या वादानंतर गोळीबार झाला आणि या गोळीबारात शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाली. अमरावती शहरात अशा घटना दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अमरावती शहरातील गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांचा कुठलाही धाक राहिला नाही, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला navneet rana angry on cp aarti singh आहे.

खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

पोलीस आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप अमरावती शहरात गतकाही दिवसांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमरावतीच्या पोलीस आयुक्त या केवळ भ्रष्टाचाराला खतपाणी देत असल्यामुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. दिवसाढवळ्या शहरात हाणामारी होते, गोळीबार होतो. सर्वसामान्य नागरिकांची हत्या होते. मात्र, पोलीस आयुक्त शहरातील गुन्हेगारीवर कुठलाही वचक ठेवू शकत नाही, असेही नवनीत राणांनी म्हटलं आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पोलीस आयुक्त अपयशी अमरावती शहरात उमेश कोल्हे यांची हत्या केली गेली. या गंभीर प्रकरणाचा तपास लावण्यात पोलीस आयुक्त आरती सिंह या अपयशी ठरल्या. अखेर हा तपास एनआयएला करावा लागला, असे देखील खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा - Firing In Amravati अमरावतीत दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात शाळकरी विद्यार्थिनी जखमी

Last Updated : Aug 12, 2022, 9:44 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.