अमरावती - अमरावती जिल्ह्यात मान्सून धडकला ( Monsoon begins in Amravati district ) असून शनिवारी 11 वाजल्यापासून अमरावती शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी ( Heavy Rain In Amravati ) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतो आहे. शनिवारी सकाळी सूर्य तळपायला लागला असताना दहा वाजता आकाशात काळे ढग दाटून आले आणि 11 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस बरसायला लागला.
मान्सूनचे उशिरा आगमन - अमरावती जिल्ह्याचा संपूर्ण विदर्भात 7 ते 10 जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते. हवामान तज्ञांनी या वर्षी 13 ते 15 जून दरम्यान विदर्भात मान्सून धडकणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मान्सून हवामान तज्ञांचा अंदाज चुकवत तीन दिवस उशिरा विदर्भात धडकला. शुक्रवारी अकोल्याला मुसळधार पाऊस झाल्यावर आज अमरावतीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतो आहे.
पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला - पावसाची आतुरतेने वाट पाहणारा जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या आगमनामुळे सुखावला आहे. हवामान तज्ज्ञांनी जिल्ह्यात 20 जून नंतर पेरणी करावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, मान्सून उशीरा धडकल्यामुळे आता पेरणीदेखील उशिराने होणार आहे. सुमारे 100 मिलिमीटर पाऊस पोहोचल्यावरच पेरणी करावी, असे कृषी कृषी विभागाने सल्ला दिला असून आणखी काही दिवस शेतकऱ्यांना पेरणीसाठी थांबावे लागणार आहे. आता सलग पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याच्या व्यक्तीने व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - PM Modis Blog On Mother : आईची तपस्या, तिच्या अपत्याला आदर्श माणूस घडवते : नरेंद्र मोदी