अमरावती: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Shinde Group MLA Santosh Bangar) यांच्या वाहनावर रविवारी अंजनगाव सुर्जी येथे ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या (MLA Santosh Bangar vehicle attack) वतीने हल्ला चढविण्यात आला होता. या प्रकरणात आज पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. (11 Shiv Sainiks arrested)

11 शिवसैनिक ताब्यात - पन्नास खोके एकदम ओके असे नारे सुद्धा देण्यात आले होते. या प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी संबंधित घटनेतील पंधरा ते वीस शिवसैनिकांवर 353 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सध्यस्थितीत हल्लेतील शिवसैनिक अभिजीत अकोटकर, महेंद्र डीपटे यांच्या सह 11 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, अशी माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे.
अशी आहे घटना- आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटात सामील होणारे आमदार आहेत. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचेसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आज ते दुपारी ३ वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली. शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनीक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताचे दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.