ETV Bharat / city

आमदार रवी राणा यांची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी; महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण - रवी राणा चौकशी शाही फेक प्रकरण

शाही फेक प्रकरणी आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांची आज सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड ( MLA Ravi Rana questioned by ACP Bharat Gaikwad ) हे चौकशी करीत आहेत. चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात आमदार रवी राणा ( Ink throw case MLA Ravi Rana ) पोहचले असताना या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.

MLA Ravi Rana questioned by ACP Bharat Gaikwad
रवी राणा चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड
author img

By

Published : Apr 7, 2022, 2:20 PM IST

अमरावती - राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृतरित्या बसवलेला पुतळा महापालिका आयुक्तांनी काढून टाकला होता. त्यानंतर आमदार रवी राणा ( Ink throw case MLA Ravi Rana ) यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक केल्याच्या प्रकरणात आरोपी असणारे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांची आज सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड ( MLA Ravi Rana questioned by ACP Bharat Gaikwad ) हे चौकशी करीत आहेत. चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात आमदार रवी राणा पोहचले असताना या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.

माहिती देताना आमदार रवी राणा

हेही वाचा - Yashomati Thakur : केंद्र, राज्याच्या संघर्षामध्ये देशाचे तुकडे पडणार; यशोमती ठाकूरांनी व्यक्त केली भीती

असे आहे प्रकरण : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीला मध्यरात्री राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यानंतर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्तांविरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. हा वाद काहीसा शांत झाला असताना युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना राजापेठ उड्डाण पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येसंदर्भात बोलाविले होते. राजापेठ उड्डाणपुलाखालील समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर आले असताना त्यांच्या अंगावर युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात कलम 307, 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आमदार रवी राणा यांना आज राजापेठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी चौकशीसाठी बोलविले असता शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. यावेळी दुपारी एक वाजता आमदार रवी राणा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहचले. मी आजच दिल्लीवरून आलो असून थेट चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात आलो असल्याचे यावेळी आमदार रवी राणा म्हणाले. माझ्याकडून पोलिसांना चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असेही आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - World Skin Health Day : उत्तम आहार आणि भरपूर पाणी पिणे, हाच त्वचा उत्तम राखण्याचा योग्य पर्याय - डॉ. पल्लवी मुरके

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.