अमरावती - लंडनमध्ये गणपती उत्सव ( Ganpati Celebration In London ) साजरा करणाऱ्या आणि इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीयांना सातासमुद्रापार आपल्या घरच्या जेवणाची चव देणाऱ्या राधाबाई बनारसे ( Radhabai Banarase ) यांचे नाव आजही लंडनमध्ये मोठ्या आदराने घेतले जाते. आयुष्याच्या वाटेवर सारं काही संपलं होतं, त्याक्षणी आपल्यासारखं काहीही नाही, अशा लंडन शहरात आपलं अस्तित्व निर्माण केलं. आणि शून्यातून विश्व कसे निर्माण करायचं, असा आदर्श त्यांनी समाजापुढे निर्माण केला. विशेष म्हणजे राधाबाईंच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ लंडन शहर एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.
पुलगावमध्ये झाला जन्म -
वर्धा जिल्ह्यात पुलगाव लगत चौंडी या अतिशय छोट्या गावात डहाके यांच्या घरात राधाबाईंचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. चार भावंडांपैकी राधाबाई दुसऱ्या क्रमांकाचा होत्या. राधाबाई ची लहान बहीण अवघी दीड वर्षाचे असताना गावात प्लेगची साथ आली आणि यामध्ये त्यांचे आई-वडील दगावले. घराची संपूर्ण जबाबदारी अवघ्या 11 वर्षे वयाच्या राधाबाईवर आली. राधाबाई 15 वर्षांचा झाल्यावर यवतमाळ येथील डेहणकर पाटलांचा मोठा मुलगा तुळशीराम यांच्याशी 1923 मध्ये लग्न झाले. दोन वर्षात राधाबाईला पहिली मुलगी झाली. यानंतर एकापाठोपाठ चार मुली राधाबाईंना झाल्या. यामुळे तर त्यांच्या सासूने तिच्याशी बोलणेही टाळले. दरम्यान, पतीच्या निधनानंतर राधाबाई पूर्णतः खचल्या. पतीच्या निधनानंतर पाच महिने भान विसरलेल्या राजाबाईचा शरीरात अचानक ऊर्जा निर्माण झाली. आपल्या मुलींच्या हालअपेष्टा त्यांना कळल्या. त्यांनी आपल्या वाडा गहाण ठेवून मोठ्या दोन मुलींचे लग्न लावून दिले. त्यांनी भाजी विकण्यास सुरुवात केली.
मुलींच्या भवितव्यासाठी दुसऱ्या लग्नाचा निर्णय -
राधाबाईच्या मदतीसाठी यवतमाळातील पांडुरंग जिरापुरे यांच्या पत्नी आनंदीबाई सतत धावून जायच्या. 1945 मध्ये जिरापुरे यांच्याकडे सीताराम उर्फ बाबाजी बनारसे हे 55 वर्षाचे गृहस्थ पाहुणे म्हणून आले. आबाजी बनारसे हे लंडन शहरात राहणारे. खरंतर ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील गणोजा येथील रहिवासी होते. त्यांना विठ्ठल, पांडुरंग, हरी असे तीन मुलं होते.
यापैकी पुंडलिका उच्चशिक्षणासाठी त्यावेळी भारतात असणाऱ्या पेशावरला गेला होता. मात्र त्याला पेशावरला कॅमेराने फोटो काढायचा नाद जडला. एका इंग्रज व्यक्तीचा त्याने फोटो काढून दिला. त्या इंग्रज व्यक्तीने त्याला स्वतःचा लंडन येथील पत्ता देऊन कधी लंडनला आला तर भेट असे म्हटले. यामुळे विठ्ठलने लंडनला जाण्याचा निश्चय केला. भारत ते इंग्लंड या प्रवासात बोटीवर काढलेल्या फोटोतून मिळालेल्या पैशातून त्याने अगरबत्ती मेणबत्ती खरेदी करून चर्च समोर विकण्यास सुरुवात केली.
हळूहळू त्याचा जम बसायला लागला. त्याने आपला लहान भाऊ पांडुरंग आणि डॉक्टर असणाऱ्या हरीला ही लंडनमध्ये बोलावून घेतले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक लोक लंडन सोडून पळाल्यावर पुंडलीक बनारसे यांनी लंडन मध्ये ओस पडलेल्या अनेक जागा कमी दरात खरेदी केल्या. पुढे जमिनीच्या व्यवहारातून विठ्ठल बनारसे प्रचंड श्रीमंत झाले. त्यांनी आपले वडील बाबाजींना सुद्धा लंडनमध्ये बोलावून घेतले. त्यांच्या नावाने एक स्वतंत्र घर ही त्यांना घेऊन दिले.
राधाबाईंना आपल्या दोन मुलींचे कसं होणार याची काळजी सतत सलत होती. जिरापुरे दाम्पत्यांनी राधाबाईची समजूत घालून दोन मुलींच्या उज्वल भवितव्याचा विचार करून आबाजी बनारसे यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला. मुलींचा विचार करून राधाबाईने लग्नास होकार दिला. त्यानंतर त्यांनी अमरावतीच्या गांधी चौक परिसरात देशमुखांच्या वाड्यात भाड्याने घर घेतले. काही दिवसातच आबाजींना राधाबाई सोबत असणाऱ्या दोन्ही मुलींना मोठ्या मुलीकडे पाठवून त्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करून दिली आणि आबाजी बनारसे यांनी राधाबाईला घेउन लंडनला गेले.
लंडनमध्ये आयुष्याला मिळाली कलाटनी -
जून 1947 मध्ये राधाबाई आबाजी बनारसे यांच्यासोबत लंडनला पोहोचल्या. मुलांनी आबासाठी घेतलेल्या फायू हिथहार्ट मार्गावरील घरात त्यांचा मुलगा पांडुरंगने लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय सुरु केला होता. याठिकाणी भारतातून आलेले विद्यार्थी राहायचे. राधाबाई या लॉजिंग-बोर्डिंग च्या कामात मदत करू लागल्या. तीन वर्षात आबाजींचा निधनामुळे राधाबाई थोड्य खचल्या. मात्र, त्यांनी शांताबाई आणि जनाबाई या दोन्ही सुनांच्या मदतीने दोन्ही मुलींना लंडनला आणण्याची व्यवस्था केली. 12 जून 1950 ला त्यांच्या दोन्ही मुली लंडनला पोहोचल्या.
अन् राधाबाई झाल्या लंडनच्या आजी -
लंडनमध्ये विठ्ठल आणि पांडुरंग बनारसे यांची मुलं राधाबाईंना आजी म्हणूनच हाक मारायचे. त्यांच्या लॉजिंग-बोर्डिंगमधील मुलही त्यांना आजीबाई या नावानेच बोलायचे. भारतातून कोणीही मोठी व्यक्ती लंडनमध्ये आली की पांडुरंग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायचे. सुप्रसिद्ध उद्योगपती आबासाहेब गरवारे यांनीसुद्धा आजीच्या हातचे जेवण टाकले होते. त्यांनी आजीबाईंची भरभरून स्तुती केली. आजीबाईंच्या हातचे जेवण केलेला प्रत्येक व्यक्ती तृप्त व्हायचा. आजींकडे आता चार पैसे शिल्लक राहायला सुरुवात झाली. इतकेच नव्हे तर भारतात राहणाऱ्या मुलींनाही आजीबाई चार पैसे पाठवायला लागल्या. '25 हूप लेंन' हे घर 29 जूने 1953 ला त्यांनी विकत घेतले. यासोबतच आणखी दोन घरत यांनी लंडनमध्ये खरेदी केले. या नव्या घरात आजीबाईंनी गणपती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या घरातच त्यांनी साईबाबांचे मंदिरही निर्माण केले. 1962 मध्ये आजीबाई लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष झाल्या. सुशीला तडकोड या त्यांच्या मानलेल्या मुलीने त्यांना इंग्रजी भाषाही शिकवली. आजीबाईच्या निधनानिमित्त लंडन शहर होते. 3 डिसेंबर 1983 रोजी आजीबाई चे निधन झाले, त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ लंडन शहर एक दिवस बंद होते, अशी माहिती आजीबाईंची नातेवाईक प्रा. डॉ.संजय शिरभाते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतना दिली.
हेही वाचा - Bhagwant Mann historic decision : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान घेणार ऐतिहासिक निर्णय, ट्विटरवर केले जाहीर