अमरावती : आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. रेल्वेसारख्या विभागात तणावपूर्ण नोकरी महिला अतिशय चोखपणे पार पाडत आहे. ही तणावपूर्ण नोकरी करताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर दीपिका बाजपयी यांनी मात्र एक भन्नाट संकल्पना शोधली आहे. या संकल्पनेतून दीपिका वाजपयी यांनी आपलं रेल्वे स्टेशन फुलून (Chandur Railway Station turned Garden) टाकले आहे.
टाकाऊ वस्तूंचा वापर करून रेल्वे स्टेशन वर विविध आकर्षक फुलांच्या फुलवारी, पक्ष्यांसाठी घरटी इतर आकर्षक वस्तू त्यांनी (Best out of Waste) बनवल्या आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक रमणीय ठिकाण बनले आहे. परिणामी असून प्रवाशांचे आकर्षण वाढू लागले आहे. दीपिका वाजपयी यांच्या कामाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
रेल्वे स्टेशनमध्ये फुलवली फुलांची बाग
दिवसभर आपल्या कुटुंबापासून दूर राहून आणि एक दोन पॉइंटरला सोबत घेऊन दिवस-रात्र रेल्वे खात्यात नोकरी करणे इतके सोपे नाही .दिवस - रात्र रेल्वे गाड्यांची ये - जा आणि कर्कश आवाज मनाला अस्वस्थ करतो. तरीही महिला स्टेशन मास्तर दीपिका वाजपयी यांनी चांदुर रेल्वे स्टेशन परिसर सुंदर आणि रमणीय केला आहे. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांचा विरंगुळा व्हावा त्यांना रमणीय वाटावे तसेच लहान मुलांचे मनोरंजन व्हावे या संकल्पनेतून त्यांनी ही फुलांची बाग फुलवली आहे .या बागेत त्यांनी निशिगंधा, चंपा, चमेली ,शेवंती सुंदर वेली अशी अनेक फुलझाडे लावली आहेत. त्याचबरोबर पक्षांचा किलबिलाट त्यांच्या कानावर सतत पडावा यासाठी त्यांनी कागदी खोक्यातून घरटी तयार केली आहे. दररोज त्या पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवतात.
हेही वाचा - Bank Holiday: आजच पूर्ण करा महत्त्वाची बँकिंग काम, जानेवारीत 16 दिवस बंद
महिला स्टेशन मास्तर
स्त्रिया घरी आपल्या अंगणात आवारात सुंदर फुले लावते पण ज्या ठिकाणी आपण काम करतो नोकरी करतो तो परिसर आपल्या मनासारखा रमणीय बनवला पाहिजे असे फार कमी ठिकाणी दिसते. रेल्वेस्थानक म्हटलं की भटके कुत्रे, अस्वच्छता भिकाऱ्यांची आश्रयस्थान ही विचारसरणी सर्वसामान्यांची आहे. मात्र ही सर्व कल्पना बाजूला ठेवून चांदुर रेल्वे स्थानकाचे रुपांतर हिरव्यागार बागेत झाले आहे. स्थानकाचा कायापालट पाहून ट्रेनमधून उतरणारे प्रवासीही थक्क होत आहे. नोकरी धारक आठ तास ड्युटी केल्यानंतर परिवारात असतात पण काही मोजकेच अधिकारी आपल्या कार्यालयाला सुंदर बनवतात त्यापैकीच एक म्हणजे दीपिका बाजपयी..
हेही वाचा - Mumbai District Bank Election : मुंबई जिल्हा बँकेवर प्रविण दरेकरांची एकहाती 'सत्ता', 21 पैकी 21 जागांवर विजय