अमरावती - मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील परतवाडा देवमाळी परिसरात एका घरी चोरी झाल्याची घटना घडल्याने अचलपूर परतवाडा मध्ये पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत निर्माण झालेली आहे. पोलीस आरोपींचा सपास करत आहेत.
देवमाळीच्या महालक्ष्मी टाऊनशिप येथील रहिवासी रतन जानराव मोरे हे शुक्रवारी सकाळी साडेदहाला आपल्या अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्याकरिता गेले हाेते. मुलीला भेटून परत आल्यावर सायंकाळी पाच वाजता त्यांना आपल्या घराचे दरवाजे उघडे दिसले. तेव्हा त्यांना घरातील कपाटामधून सोन्या चांदीचे दागिने व रोख तीस हजार रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. घरी चोरी झाल्याची खात्री होताच परतवाडा पोलिसांना याची माहिती दिली. तर मोरेंच्या घरी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले. मात्र, अजूनही चोरट्यांचा सुगावा लागला नाही. चोर आल्यावर त्यांच्याकडे श्वान होता. श्वानाने प्रतिकार केला. मात्र, चोरांनी श्वानाला मारहाण करून बाहेर फेकून दिले.
याआधीही झालेली चोरी
यापूर्वी दोन दिवसांआधीच परतवाड्यातील ताणली भागामध्ये आठ ते दहा चड्डी बनियान वर आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. त्यांचाही ठिकाणा पोलीसांना लागला नाही. शिक्षक मोरे यांच्याकडील पंच्याहत्तर ग्रॅम दागिने चोरीला गेले आहेत. याचबरोबर दहा लाखांचा ऐवजही चोरला आहे.
हेही वाचा - पैशासाठी आईचा दगडाने ठेचून केला खून, आरोपी मुलास गेवराईतून अटक