अमरावती - हैदराबाद येथील प्राणी प्रेमी यांच्या सतर्कतेने व तळेगाव दंशासर पोलिसांच्या पुढाकाराने हैदराबाद येथे अवैधरित्या नेत असलेल्या 58 उंटांना जीवनदान मिळाले आहे. या उंटांना राजस्थानातून अवैधपणे काही व्यक्ती हैदराबादला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना हैदराबाद येथील प्राणी मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यावरून प्राणी मित्र संघाचे पदाधिकारी व तळेगाव पोलिसांनी उंट ताब्यात घेतलेत. उंटाची प्रचंड उपासमार झाल्याचे पुढे आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - Amravati Unseasonal Rain : अमरावती जिल्ह्याला वादळी पावसासह गारपीटीने झोडपले; शेतपिकांचे मोठे नुकसान
अमरावती जिल्ह्यातील निमगव्हाण गावाजवळ प्राणी मित्र संघाचे पदाधिकारी व पोलिसांना उंटांचा ‘काफिला’ दिसला. त्यांची पाहणी केली असता, एक उंट रक्तबंबाळ तर, काही उंट आजारी असल्याचे आढळले. तसेच, उंटांना सुमारे १ हजार १०० ते १ हजार २०० किलोमीटर अंतरावरून पायी आणले, त्यांना योग्य चारापाणी सुद्धा झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्राणी मित्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तळेगाव दशासर पोलिसांत तक्रार दाखल केली.
उंटांना अवैधपणे तेलंगणाच्या दिशेने कत्तलीसाठी घेऊन जात असून अतिशय क्रूरपणे त्यांना पायी नेले जात होते. त्यांना औषधोपचार केला नाही, असा उल्लेख तक्रारीत केला आहे. उंट घेऊन जाण्याबाबत कोणतेही कागदपत्र प्राणी मित्र संघाचे पदाधिकारी, पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळे, जसराज श्रीमाळ यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी उंटांना घेऊन जाणाऱ्यांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांद्वारे गुन्हा दाखल केला.
राजस्थानमधून २५ हजारांत खरेदी आणि तेलंगणात ७५ हजार ते १ लाखात विक्री
राजस्थानमधील या उंटाना खरेदी करून त्यांना कत्तलीसाठी हैदराबादमध्ये नेले जात होते. तेलंगणात 75 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत एका उंटाची विक्री केली जात असल्याची माहिती प्राणी मित्रांनी दिली. मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारे विक्री होत असताना आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
उंटाना गोशाळेत ठेवण्यात आले
दरम्यान या ५८ उंटाना पोलिसांनी आता एका गोरक्षनाथ ठेवले आहे. त्याच गोरक्षनाथ सध्या या उंटाची चारा - पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी केल्यानंतर या उंटाना पुन्हा राजस्थानमधील उंट शाळेत पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे आईचे छत्र हरपलं; दोन गतिमंद भावांना मोठा भाऊ देतो मायेची ऊब