ETV Bharat / city

Amravati Crime News : घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Mahatma Phule Colony Behind Tehsil Office

पती-पत्नीच्या घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. त्यात राग अनावर झाल्याने पतीने-पत्नीवर ( Deceased Wife Ritika Satish Kalbande ) चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना चांदूरबाजार येथील तहसील कार्यालयाचे मागील महात्मा फुले काॅलनीत ( Mahatma Phule Colony ) ( behind Tehsil Office ) शुक्रवारी घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीनेसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तत्काळ हालचाल करून त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

Satish alias Kishore Madhukar Kalbande
आरोपी सतीश उर्फ किशोर मधुकर काळंबांडेट
author img

By

Published : Aug 6, 2022, 1:15 PM IST

अमरावती : ऐन जेवण करण्याचे वेळेतच पती-पत्नीत ( Deceased Wife Ritika Satish Kalbande ) घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. त्यात राग अनावर झाल्याने पतीने-पत्नीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना चांदूरबाजार येथील तहसील कार्यालयाचे मागील महात्मा फुले काॅलनीत ( Mahatma Phule Colony ) शुक्रवारी घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीनेसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ( Chandurbazar Police ) तत्काळ हालचाल करून त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

आरोपी पती उपाचारासाठी रुग्णालयात दाखल : ऋतीका सतीश उर्फ किशोर काळबांडे ( Deceased Wife Ritika Kishore Kalbande ) ४५ असे मृतक पत्नीचे नाव असून, सतीश उर्फ किशोर मधुकर काळबांडे ५० असे आरोपी पतीचे ( Satish alias Kishore Madhukar Kalbande ) नाव आहे. चांदूरबाजार पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सतीशवर भादंवि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली. या घटनेत पतीनेही स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी घटनास्थळ गाठून आरोपी पतीचा जीव वाचविला. त्याला अमरावती रिम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मृत महिला होती शिक्षिका : मृतक ऋतीका व सतीश हे पती, पत्नी आपल्या १५ वर्षीय मुलगा क्षितीजसोबत चांदूरबाजार येथील महात्मा फुले काॅलनीत तीन महिन्यांपूर्वीच डाॅ. किरण संजयराव भाविक यांचे घरी भाड्याने राहत होते. सन २००४ मध्ये ऋतीकाचे लग्न सतीश सोबत झाले. तेव्हापासून ऋतीकाने काकडा येथे ४ वर्षे, आष्टीच्या शाळेवर ४ वर्षे, अमरावतीला दोन वर्ष, पोटे विद्यालयात ३ वर्ष, हर्षराज काॅलनी येथील अरुणोदय शाळेत २ वर्षे, वाशीम येथील शाळेत अडीच वर्षे शिक्षिकेची नोकरी केली. गेल्या तीन महिन्यांपासून ती चांदूरबाजार येथील होलीपेथ काॅन्व्हेटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिचा मुलगा क्षितीज १५ हा जगदंब पब्लिक स्कूलमध्ये १० वीत शिकत आहे.

घरगुती वादातून घडला प्रकार : मृतक आणि तिचा पती व मुलगा चांदूरबाजार येथील महात्मा फुले काॅलनीत डाॅ. किरण भाविक यांचे घरात भाड्याने राहत होते. पती सतीश हा आठवड्यातुन एक-दोन दिवस येथे मुक्कामी राहत होता. शुक्रवारी जेवणाचे ताट समोर असतानाच पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान सतीशने ऋतीकावर चाकून अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून सतीशनेही स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेऊन गळफास लावला. मात्र, ऐन वेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने सतीशचे प्राण वाचले.

पोलिसांनी आरोपीला केले रुग्णालयात दाखल : गंभीर अवस्थेतील सतीशला पोलिसांनी तत्काळ अमरावतीला रिम्स रुग्णालयात दाखल केले. त्याचेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळाला एसडीपीओ अतुल नवगीरे यांनी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात चांदूरबाजारचे प्रभारी ठाणेदार नरेंद्र पेंदोर, पीएसआय वैभव चव्हाण, पीएसआय प्रतीभा मेश्राम, एएसआय विनोद इंगळे, एसी विनोद दाभणे, प्रशांत भटकर, महेश काळे पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा : Varsha Raut at ED office: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत मुंबईतील ईडी कार्यालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.