ETV Bharat / city

Amravati Shiv Sena : अमरावती जिल्ह्यात सेनेला खिंडार, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील - माजी खासदार आनंद अडसूळ

शिवसेनेतील ३९ आमदार फोडून स्वतंत्र गट स्थापन करत भाजपासोबत घरोबा करून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले. मुबंई ठाणे, पालघर सह इतरही जिल्ह्यांमधुन आमदार व खासदार सेनेला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. (Amravati Shiv Sena Party) परंतु 'जिल्ह्यात समदं काही ओके हाये, अशी परिस्थिती असतांच माजी खासदार आनंद अडसूळ (Former MP Anand Adsul) यांनी नाराजीचा सूर आवळत, सेनेला सोडचिठ्ठी दिल्याची बातमी आली. आणि येथूनच सेनेला खिंडार पडायला सुरुवात झाली. माजी खा. अडसूळ यांचे सुपुत्र आणि दर्यापूर-अंजनगाव सुर्जी चे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी सेना कार्यकर्त्याच्या बैठका घेत सेनाच्या गडाला सुरुंग लावला आहे.

Shivsena
शिवसेना
author img

By

Published : Jul 17, 2022, 4:13 PM IST

अमरावती: शिवसेनेतील ३९ आमदार फोडून स्वतंत्र गट स्थापन करत भाजपासोबत घरोबा करून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले. मुबंई ठाणे, पालघर सह इतरही जिल्ह्यांमधुन आमदार व खासदार सेनेला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. (Amravati Shiv Sena Party) परंतु 'जिल्ह्यात समदं काही ओके हाये, अशी परिस्थिती असतांच माजी खासदार आनंद अडसूळ (Former MP Anand Adsul) यांनी नाराजीचा सूर आवळत, सेनेला सोडचिठ्ठी दिल्याची बातमी आली. आणि येथूनच सेनेला खिंडार पडायला सुरुवात झाली. माजी खा. अडसूळ यांचे सुपुत्र आणि दर्यापूर-अंजनगाव सुर्जी चे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी सेना कार्यकर्त्याच्या बैठका घेत सेनाच्या गडाला सुरुंग लावला आहे.

ठाण्याचे उपमहापौर रमाकांत माडवी व अमरावती दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात त्यांनी जाहीर प्रवेश केला. हा मतदार संघ अमरावतीचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पाडली. ठाणे येथील उपमहापौर रमांकात माडावी यांची अमरावती येथे आज गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. दर्यापूर येथे सुद्धा शिवसेनेचे तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोपाल अरबट यांच्या समवेत रवि गणोरकर, विनय गावंडे, महेंद्र भांडे, राहुल भुम्बर, राहुल गावंडे, दुराटे, कोरडे, काठोळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे आता शिंदे गटाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

का गेले शिंदे गटात? - माजी खा. अडसूळ व पुत्र माजी आ.अभिजित यांना सिटी बँक घोटाळाप्रकरणी ईडी चे समन्स प्राप्त झाले होते. या प्रकरणात सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मदत न केल्याने त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. या नाराजी मुळेच खा.आनंद अडसूळ यांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्याचं समजते. कॅप्टन अभिजित अडसूळ हे २००९ ते २०१४ दरम्यान आमदार होते. दर्यापूर-अंजनगाव मतदार संघात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. आपले नेतेच शिंदे गटात गेल्याने शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

हेही वाचा: epali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.