ETV Bharat / city

Honey Village in Melghat : मेळघाटात साकारल्या जातेय ‘मधाचे गाव’; जाणून घ्या काय आहे संकल्पना - मधुपर्यटन

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत ( Honey village developing in Melghat ) आहे. त्याअनुषंगाने श्रीमती सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या गावातून परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी आज व्यक्त केला. ( Honey Village in Melghat )

Honey Village in Melghat
अमरावती मधाचे गाव आमझरी
author img

By

Published : Aug 4, 2022, 11:02 AM IST

अमरावती - चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित ( Honey Village in Melghat ) होण्यासाठी या योजनेची सर्व विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी आज व्यक्त केला.

अनेक जणांची उपस्थिती - राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्रीमती सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावन कुमार, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिपना महाविद्यालयातील मधुमक्षिका पालन विभागप्रमुख आदी अनेकजण उपस्थित होते.

Honey Village in Melghat
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांची बैठक

मधाचे गाव म्हणून विकसित होणार - सिन्हा म्हणाल्या की, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, ग्रामीण भागातील युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मधाचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने संकलन व त्यानुषंगाने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

हेही वाचा - Rahul Gandhi taunts BJP RSS: हर घर तिरंगा मोहिमेवरुन राहुल गांधींनी भाजपसह आरएसएसची उडवली खिल्ली

मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास - मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्व मोठे आहे. त्याचा पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठीही लाभ होतो. हे लक्षात घेता मधमाश्यांच्या संवर्धनाबाबत उपक्रम आखण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल व मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास होईल. मध केंद्र योजनेत मधमाशीपालनासाठी प्रशिक्षण, साहित्यवाटप, अनुदान आदी सुविधा मिळतात. त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण - सिन्हा यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना उपक्रमाची माहिती दिली. यावेळी स्थानिकांना आग्या मधमाश्यांचे कीटवाटप करण्यात आले. खादी व ग्रामोद्योग आयोग व वन विभागामार्फत आमझरी येथील महिलांना नुकतेच अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा - गायक किशोर कुमार यांची आज 93 वी जयंती; चाहत्यांनी मंदिर, संग्रहालय बनवून आठवणींना ठेवलंय जीवंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.