ETV Bharat / city

Heavy rain in Amravati : अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

अमरावती शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून ( Heavy rain in Amravati district ) मुसळधार पाऊस कोसळत आहे. 18 जून रोजी अमरावती जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळल्यावर पहिल्यांदाच आज संततधार पाऊस बरसतो आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसामुळे संपूर्ण जिल्हा चिंब ओला झाला आहे.

author img

By

Published : Jul 5, 2022, 9:26 AM IST

Heavy rain in Amravati district
मुसळधार पाऊस अमरावती

अमरावती - अमरावती शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून ( Heavy rain in Amravati district ) मुसळधार पाऊस कोसळत आहे. 18 जून रोजी अमरावती जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळल्यावर पहिल्यांदाच आज संततधार पाऊस बरसतो आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसामुळे संपूर्ण जिल्हा चिंब ओला झाला आहे. 18 जुलैला मान्सूनचा पहिला पाऊस अमरावती जिल्ह्यात कोसळल्यावर आतापर्यंत अधूनमधून दोन ते तीन वेळा पावसाच्या सरी अमरावती शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी बरसल्या होत्या. संततधार पावसाची प्रतीक्षा अमरावतीकरांना असताना उशिरा का होईना मात्र आज जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत आहे.

जिल्ह्यातील हवामानाची माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - भाजपच्या वतीने उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली; अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा - अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी 20 जून नंतर शेतात पेरणी केली. आता दमदार पाऊस होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हवामान खात्याने सुद्धा 20 जून नंतर सलग पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला होता. पावसाने मात्र अचानक दडी दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरले होते. पुन्हा पेरणी करावी लागेल का? अशी भीती शेतकऱ्यांना असताना आज अखेर सर्व दूर चांगला पाऊस बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत अतिशय तुरळक पाऊस - गतवर्षी अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गेल्या वर्षी 4 जुलै पर्यंत जिल्ह्यात 216.4 मिलिमीटर पाऊस बरसला असताना या वर्षी मात्र चार जुलै पर्यंत जिल्ह्यात केवळ 143.3 मिलिमीटर इतकाच पाऊस बरसला आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यात जून महिन्यात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. सोमवारी जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या स्वरुपात पाऊस कोसळला.

मुसळधार पावसाचा इशारा - मंगळवारी पहाटेपासून अमरावती शहरासह भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, चांदूरबाजार, अचलपूर, तिवसा या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून धारणी आणि चिखलदरा तालुक्यात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळणार असा अंदाज व्यक्त केला असून, पुढील 24 तासांत जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी सातही आरोपी एनआयएच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.