अमरावती - शहरात शनिवारी दुपारी आणि सायंकाळी काही भागात जोरदार वादळासह पाऊस कोसळला. या वादळाचा फटका शहराच्या गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक बसला असून, जे एनडी मॉलच्या इमारतीला बाहेरून लावलेले काच वादळामुळे खाली कोसळले. तर, नमुना परिसरात भल्यामोठ्या वडाच्या झाडाची फांदी एका घरावर कोसळल्यामुळे खळबळ उडाली ( heavy rain and storm in amravati ) आहे.
शाम चौकात मोठा अपघात टळला - शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळामुळे श्याम चौक परिसरातील जे एनडी मॉलच्या बाहेर लागलेली काचे अचानक खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. ही घटना घडल्यावर शहर कोतवाली पोलिसांनी काही वेळासाठी श्याम चौक ते सरोज चौक हा मार्ग बंद केला होता. या मार्गावर पडलेल्या काचा गोळा करण्यासाठी एका बाजूला बॅरिकेड्स लावून बाजूने वाहतूक सुरु करण्यात आली.
तसेच, नमुना परिसरात पटेल घोडेवाला गल्लीमध्ये असणाऱ्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाची भली मोठी फांदी दुपारी 3 वाजताच्या प्रकाश धोटे यांच्या घरावर कोसळली. सुदैवाने यावेळी दुर्दैवी घटना घडली नाही. घराच्या वरच्या मजल्यावर झाडाची फांदी कोसळल्यानंतर सुद्धा महापालिका प्रशानसनाने मात्र तीन तास उलटल्यावरही दखल घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खंत व्यक्त केली.