ETV Bharat / city

अमरावतीत कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी 'भव्य मॉल' - अमरावती कारागृह

वस्तू विक्री करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पन्नास लाख रुपयांचा निधी देऊन विक्रीसाठी एक मॉल उभारण्यात आला आहे. असे मॉल उभारणारे अमरावती कारागृह राज्यातील पाहिले कारागृह आहे. कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे.

कैद्यांनी तयार केलेले वस्तू
कैद्यांनी तयार केलेले वस्तू
author img

By

Published : Jun 29, 2021, 3:42 PM IST

अमरावती - कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या अनेक बंदीस्त कैद्यामध्ये वेगवेगळ्या कला, कौशल्य असतात. या कलेच्या माध्यमातून कारागृहातील कैदी विविध कामे करतात. अशाचप्रकारे अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांनी हस्तकलेच्या माध्यमातून विविध आकर्षक व देखण्या वस्तू तयार केल्या आहे. या वस्तू विक्रीच्या माध्यमातून त्यांना फायदा देखील होणार आहे. वस्तू विक्री करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पन्नास लाख रुपयांचा निधी देऊन विक्रीसाठी एक मॉल उभारण्यात आला आहे. असे मॉल उभारणारे अमरावती कारागृह राज्यातील पाहिले कारागृह आहे. कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. दरम्यान या मॉलचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी 'भव्य मॉल'

'हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल'

'उडान' उपक्रम कैद्यांच्या कला कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा असून, त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला. कारागृहातील कैदी कारागीर, कलावंताच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून सुंदर वस्तू व कलाकृतींची निर्मिती होते. या वस्तूंच्या विक्रीसाठी हे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्जनशीलतेला वाव देऊन सकारात्मकता पेरणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -दिलासादायक: रत्नागिरीतील तिन्ही बालकांची डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.