ETV Bharat / city

शिपायाच्या मुलीची जागतिक तिरंदाजी स्पर्धा, आशिया कप स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड

हरियाणा राज्यातील रोहतक येथे या स्पर्धांची निवड चाचणी पार पडली होती. या चाचणीत साक्षीची भारतीय संघात तिसऱ्या स्थानावर नियुक्ती झाली. आता ती माद्रिद (Madrid) स्पेन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेकरिता आणि तायपेयी (Taipei) येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेकरिता रवाना होणार आहे.

शिपायाच्या मुलीची जागतिक तिरंदाजी स्पर्धा व आशिया कप स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड
author img

By

Published : Jun 27, 2019, 10:36 AM IST

अमरावती - हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतांना अनेक संकटांवर मात करत चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याच्या एका मुलीने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, येथील नांदगाव हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या साक्षी तोटे या विद्यार्थीनीने अमरावती जिल्हाचे नाव उंचावले आहे. साक्षीची जागतिक तिरंदाजी स्पर्धा आणि आशिया कप स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली आहे.

साक्षीच्या यशाने तिच्या कुटुंबासोबतच गावकऱ्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता. हरियाणा राज्यातील रोहतक येथे या स्पर्धांची निवड चाचणी पार पडली होती. या चाचणीत साक्षीची भारतीय संघात तिसऱ्या स्थानावर नियुक्ती झाली. आता माद्रिद (Madrid) स्पेन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेकरिता आणि तायपेयी (Taipei) येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेकरिता साक्षी रवाना होणार आहे.

साक्षी तोटेची जागतिक तिरंदाजी स्पर्धा व आशिया कप स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड

अमरावतीच्या नांदगाव सारख्या ग्रामीण भागात गेल्या २१ वर्षांपासून एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी येथे साक्षीने प्रशिक्षण घेतले. छत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या या खेळाचे साक्षीने प्राथमिक धडे घेतले. साक्षी आणि तिचे प्रशिक्षक अमर जाधव यांनी घेतलेली मेहनत, जिद्द, सातत्य आणि परिश्रम यामुळेच हे आज शक्य झाले, असे साक्षी तोटे हिने सांगितले. तसेच मी निश्चितच जागतिक तिरंदाजी स्पर्धेत आपल्या देशा साठी सुवर्णपदक मिळवून देशाचा सन्मान वाढविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल, असा विश्वास साक्षीने यावेळी व्यक्त केला.

नांदगाव खंडेश्वरमध्ये साक्षीचे आगमन होताच गावकऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताश्यात तिची विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. तसेच, एकलव्य धनुर्विदा क्रीडा अकादमीच्या २४५ विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.

Intro:अमरावती पॅकेज स्टोरी

शिपायाच्या मुलीची जागतिक तिरंदाजी स्पर्धा व आशिया कप स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड.

गावकऱ्यांनी वाजत गाजत रॅली काढून  केला भव्य सत्कार.

अमरावती अँकर
हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतांना अनेक संकटावर मात करत चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याच्या एका मुलींने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या एका मुलीने अमरावती जिल्हाचे नाव रोशन केले आहे.पाहूया एक रिपोर्ट.

Vo-1
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर गावात हातात रंगेबी रंगी फुलांचे हार,आरतीच्या ताटात गोड मिठाईचा डबा  घेऊन उभ्या असलेल्या महिला,गावातील बच्चे कंपनी व गावकरी हे काही एखाद्या पालखीची वाट पाहत नाही.तर ते वाट पाहत आहे.त्यांच्या डोळ्या देखत लहाण्याची मोठी झालेली आणि आता गावाच नाव देशभरात उंचावणाऱ्या साक्षी तोटेच्या यशाच्या मिरवणूकीची .आता तुम्ही म्हणाल या साक्षी तोटेन अस कोणतं काम केलं की एवढे सारे गावकरी तिच्या मिरवणुकीच्या प्रतीक्षेत आहे.अहो याच साक्षीची जागतिक तिरंदाजी स्पर्धा व आशिया कप स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे .हरियाणा राज्यातील रोहतक येथे पार पडलेल्या निवड चाचणीत साक्षी हिची Madrid (स्पेन) येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेकरिता व Taipei येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेकरिता भारतीय संघात तिसऱ्या स्थानावर नियुक्ती झाली.म्हणून तर आज तिच्या मूळगावी तिची सजवलेल्या गाडीत बसून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली.तिच्या या यशामुळे गावचे नाव मोठे होण्याबरोबरच अनेक विद्यार्थ्यांना ती प्रेरणा देणारी ठरणार असल्याचं मत तिचे मार्गदर्शक सदानंद जाधव यांनी सांगितले.

बाईट-1-सदानंद जाधव

VO-2
अमरावतीच्या नांदगाव सारख्या ग्रामीण भागात गेल्या एकवीस वर्षपासून स्थापीत एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी ने येथे छत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या या खेळाचे कु साक्षी ने प्राथमिक धडे घेतले.  साक्षी व तिचे कोच अमर जाधव यांनी घेतलेली मेहनत, जिद्द, सातत्य व परिश्रम यामुळेच हे आज शक्य झालं.असे साक्षी तोटे हिने सांगितले, तसेच मी निश्चितच जागतिक तिरंदाजी स्पर्धेत आपल्या देशा साठी सुवर्णपदक मिळवून देशाचा सन्मा वाढविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल असा विश्वास साक्षी ने व्यक्त केला.

बाईट-2-साक्षी तोटे

VO-3
आज अमरावतीच्या नांदगांव खंडेश्वर येथे
सायंकाळी साक्षीचे आगमन होताच तिचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्याच्या आतषबाजीत व ढोल ताश्यात तिची विजयी रॅली काढण्यात आली होती.यावेळी ठीक ठिकाणी नी तिचा सत्कार गावातील महिलांनी केला.तसेच एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी तर्फे आज तिचा भव्य असा सत्कार करण्यात आला.एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी च्या २४५ विद्यार्थ्यांनी आता पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.